पुणे, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
सहसंपादक,
मो. ९९२२४१९१५९
पुणे बावधन चांदणी चौकातील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर मध्ये सोमवार दि.३० मार्च रोजी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नित्य अभिषेक, ध्वजारोहण, चढावे, पूजन, महाअभिषेक, भगवान महावीरांचा भव्य पालखी सोहळा, महाआरती, सत्कार समारंभ, वार्षिक आढावा वाचन, जन्मोत्सव पाळणा, महाप्रसाद इत्यादी धार्मिक तसेच रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर, जैन पाककला, चित्रकला स्पर्धा आदी विविध भरगच्च कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात मंडप उभारून नेत्रदीपक विदयुत रोषणाई करण्यात आली होती.
भगवान महावीर यांचा २६२५ वा जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त सकाळी नित्य अभिषेक झाल्यानंतर ध्वजारोहण प्रेमलता दोशी व रौनक दोशी परिवार तर पालखी मिरवणूक मध्ये तीर्थंकर भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान करण्याचा चा मान प्रीतम मेहता परिवार व जिनवाणी शास्त्र चा मान रेणुका बंडी यांना मिळाला.
दरम्यान सकाळी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये ६३ जणांनी रक्तदान केले तर २५२ नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला, यासाठी पुणे ब्लड बँक व देशपांडे डोळ्यांचे हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले.
सकाळी ९ वाजता भगवान महावीर यांची प्रतिमा चांदीच्या पालखीत विराजमान करून पालखी सोहळा व शोभायात्रेची सुरवात झाली.
यावेळी "त्रिशला नंदन वीर की जय बोलो महावीर की", "अहिंसा परमो धर्म की जय" तसेच नमोकार महामंत्राच्या जयघोषात भव्य पालखी शोभायात्रा मिरवणूक संपन्न झाली.
सुमधुर बँडच्या तालावर जैन युवक-युवतींनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला. पालखी मिरवणूक मार्गावर बावधन मधील नगरसेवक दिलीप वेडे पाटील आणि नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी भव्य स्वागत कमान तर नगरसेवक पृथ्वीराज सुतार, नगरसेविका अल्पना गणेश वरपे, नगरसेविका रुपाली पवार यांनी स्वागत फलक उभारून पालखी मिरवणुकीचे स्वागत केले.
यानंतर मुख्य मूर्तीचा अभिषेक, शांतिधारा व महाआरती मंदिर मध्ये संपन्न झाली. दुपारी १२ वाजता भगवान महावीरांचा जन्मोत्सव पाळणा संपन्न झाला. यावेळी भगवान महावीर महाशांतीधारा करण्याचा मान अतुल जैन परिवार, भगवान चंद्रप्रभु महाशांतीधारेचा विशाल आहाळे, भगवान मुनीसुव्रतजी महाशांतीधारेचा सौरभ गांधी, त्रिशला माता सायली अमित पाटील आणिआत्याचा मान रेणुका बंडी, इंद्रायणी चोगुले यांना मिळाला.
यानंतर वार्षिक आढावा वाचन करून जैन पाककला व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
त्यानंतर सर्वांनी सामुहिकपणे महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी महाआरती संपन्न झाली. नंतर पंडितजी सागर हुक्कीरे यांचे धर्म प्रवचन संपन्न झाले.
जन्मकल्याणक महोत्सव निमित्त नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका वासंती जाधव, नगरसेविका रुपाली पवार, नगरसेविका ज्योत्स्ना कुलकर्णी, जगन्नाथ कुलकर्णी, नवनाथ जाधव, गणेश वरपे, सचिन पवार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भगवान महावीर मंडळ आणि जैन मंदिराचे विश्वस्त
उदय लेंगडे, ज्योती बुरसे, शिरीष बोरगावे, अशोक मगदूम, दिनेश गणेशवाडे, सुनील बिरनाळे, मोहन कुडचे, रमेशभाई शहा, अजित शेट्टी, महावीर पालगौडर, प्रीतम मेहता, अमित गांधी, तात्यासाहेब खोत, कुमार थोटे, अभिजित शहा, शोभा पोकळे, प्रकाश कुडचे, विशाल दगडे, प्रशांत गोधा, प्रशांत पाटील, केतन खापरे, चेतन जैन, शुभम बिंदगे, प्रीती पाटील, सागर हुक्कीरे पंडितजी उपस्थित होते. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित कोथरूड व बावधन परिसरातील जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा