*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाइम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९*
सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी सावता परिषदेच्या शिष्टमंडळाने केली. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शिष्टमंडळाने लेखी निवेदन दिले.
सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांना होणाऱ्या विधान परिषदेमध्ये संधी देऊन पक्षाने ओबीसी समाजाचा, माळी समाजाचा सन्मान करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, सावता परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष तथा ओबीसी विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष राजगुरू, विदर्भ सावता परिषदेचे कार्याध्यक्ष वाशिम जिल्ह्याचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग कवठाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली.
सावता परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस संतोष राजगुरू म्हणाले
सावता परिषदेचे राज्यभर सक्रिय संघटन असून त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालेला आहे. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे साहेब यांनी ओबीसी विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची मजबूत बांधणी केली आहे. पक्षाचे दिवंगत नेते तसेच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेस विभागाचे दोन दिवसीय निवासी चिंतन शिबिर संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या अनमोल योगदानाचे देखील कौतुक केले होते. राष्ट्रवादीची जबाबदारी मिळाल्यापासून महाराष्ट्रभर किमान तीन वेळा तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाड्या वस्ती वरती जाऊन अजितदादांचे विचार तळागाळापर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम कल्याण आखाडे साहेब यांनी केले आहे. सावता परिषदेचे संघटन महाराष्ट्रभर आहे या सर्वांचा विचार करून उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याचे कृषिमंत्री व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण आखाडे यांना विधानपरिषद मिळावी म्हणून लेखी निवेदन दिले आहे. या मागणी संदर्भात उपरोक्त सर्व नेते नक्कीच सकारात्मक विचार करून मदत करतील अशी अपेक्षा श्री. राजगुरू यांनी व्यक्त केली.
यावेळी सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, सावता परिषदेचे कार्याध्यक्ष, विदर्भाचे प्रतिनिधी पांडुरंग कवठाळे, सावता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निखाडे, अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष रविभाऊ भांदुर्गे, चेतन इंगोले शहराध्यक्ष वाशिम, श्री दोडमिसे साहेब जिल्हाध्यक्ष सोलापूर राष्ट्रवादी ओबीसी विभाग, शरदराव रासकर सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष महादेव माळी, सावता परिषदेचे पदाधिकारी राज्यातील व वाशिम जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा