Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ एप्रिल, २०२६

वरकुटे बुद्रुक तालुका इंदापूर येथील प्रतापराव देवकर (गुरुजी) यांचे अपघाती निधन.

 अकलूज प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 


इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु येथील सेवानिवृत्त प्रा.शिक्षक कै प्रतापराव विठ्ठलराव देवकर तथा (गुरुजी)  यांचे अपघाती निधन मृत्यू समय ते९५ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले सुना नातवंडे परतवंडे असा परिवार आहे 

.जन्मापासून प्रतिभा लाभलेले लोकप्रिय एकटे व्यक्तीमत्व होते.वरकुटे बु येथील जेष्ठ नागरिक श्री देवकर गुरुजी यांचे ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजनेच्या सुमारास आपल्या नातवासह इंदापूर येथे जात असताना मागून येणाऱ्या चारचाकी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच  गतप्राण झाले व नातू चि.संदिप बाजूला फेकला गेला..चि.संदिप रुग्णालयात औषध उपचार घेत आहे.त्यांनी आपल्या शैक्षणिक काळात अनेक शिक्षक निर्माण केले.त्यांचा शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक व कौटुंबिक स्तरावर दबदबा होता.नजिकच्या परिसरातील व  घरातील सर्वांचे दादा या नावाने परिचित होते  ते सतत पंचक्रोशीतील प्रत्येकाच्या सुख दुःखात ते स्वतः जातीने सहभागी होत होते.अभ्यासू व्यक्तीमत्व व राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.

आपल्या ९५ वर्षांच्या वाटचालीत त्यांनी अनेक नाती व ऋणानुबंध निर्माण केले.व निभावले ख-या अर्थाने त्यांचा हात लागणा-या लोकांचे कल्याण झाले.म्हणून समाजात त्यांना आदराने दादा म्हणत.

त्यांच्या अकस्मात निधनाने पंचक्रोशीत अवकळा पसरली आहे.आपल्याच घरातील कुटुंब सदस्य गेल्याचे दुःख सर्वांच्या देहबोलीवरून दिसत होते.गुरूवार दि.२ एप्रिल रोजी त्यांचा तिसऱ्याचा म्हणजे सावडण्याचा विधी झाला.या प्रसंगी हजारोंच्या संख्येने आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच  राज्याचे कृषीमंत्री  दत्तात्रय भरणे (मामा) उपस्थित  होते.महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून व त्यांनी वैयक्तिक स्वरूपात त्यांनी देवकर गुरुजी यांना मोजक्या शब्दांत श्रद्धांजली वाहिली.याप्रसंगी हजारोंच्या संख्येने समाज अंत्यविधीत सहभागी झाला होता.प्रत्येकाच्या मनात घरातील माणूस गेल्याचे दुःख दिसत होते.देवकर गुरुजी म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते.स्वताच्या कुटुंबाकडे लक्ष देत असताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी अनेक उपक्रम राबविले.त्यांच्या आकस्मित अपघाती निधनाने सर्वांचेच कधीही भरून न निघण्यासारखी पोकळी निर्माण झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा