*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना (Human Rights) यांच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी श्री. दिनेश हुकुमचंद मुथा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार उत्साहात पार पडला. हा सत्कार करमाळ्यातील नगरसेवक श्री. संजय (पप्पू अण्णा) सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी श्री. मुथा यांना पारंपरिक पद्धतीने शाल, श्रीफळ व फेटा देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या निवडीमुळे करमाळा तालुक्याचे नाव उंचावले असून, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांना देण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमावेळी खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली:
आनंद रोडे, वैभव सावंत, पप्पू सूर्यवंशी, नागेश उबाळे, पांडुरंग सावंत, दिनेश राठोड, प्रशांत यादव, संतोष यादव इत्यादी.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. मुथा यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, मानव अधिकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा