Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २९ एप्रिल, २०२६

तुळजापूरमध्ये शिवसेनेचे एकदिवसीय लक्षणीय उपोषण; नगरपरिषदेकडून शौचालय पूर्ण करण्याचे आश्वासन

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*



तुळजापूर शहरातील निजामकालीन शौचालयाचे अर्धवट काम पूर्ण न करता नगरपरिषदेकडून काम थांबवण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेना शहर व जय अंबिका मंडळाच्या वतीने तुळजापूर नगर परिषदेसमोर एकदिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले. हे उपोषण शिवसेना शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

तुळजापूर हे राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळ असून दररोज मोठ्या संख्येने देवीभक्त येथे येत असतात. मात्र, शहरातील सार्वजनिक सुविधांचा अभाव जाणवत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात होती. विशेषतः निजामकालीन शौचालयाचे काम अर्धवट ठेवण्यात आल्याने भक्तांसह नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर हे उपोषण करण्यात आले.

उपोषण सुरू झाल्यानंतर काही तासांतच नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कर्मचारी उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी उपोषणकर्ते रमेश चिवचिवे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेतली जाईल, तसेच संबंधित शौचालयाचे काम पूर्ण करून ते लवकरात लवकर देवीभक्तांसाठी खुले करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यासंदर्भात लेखी पत्र देण्यात आल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

दरम्यान, येणाऱ्या काळात नगरपरिषदेकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रमेश चिवचिवे यांनी दिला आहे.

या उपोषणावेळी शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहरप्रमुख बापूसाहेब भोसले, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, संभाजी नेपते, संजय लोंढे, बाळू भैय्ये तसेच शिवसैनिक व जय अंबिका तरुण मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा