Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ५ मे, २०२६

पंढरपूर तालुक्यातील शेतजमीन खरेदी विक्रीचा अहवाल तातडीने तहसीलदाराकडे पाठवण्यासाठी केली 11000 ची मागणी करणाऱ्या मंडल अधिकाऱ्यास न्यायालयाने सुनावली पाच वर्षे सक्त मजुरी व १५०००रु दंड

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


..

पंढरपूर तालुक्यातील  शेतजमीन खरेदी विक्रीचा अहवाल तातडीने तहसीलदाराकडे पाठवण्यासाठी केली ११०००/-रु  ची मागणी करणाऱ्या मंडल अधिकाऱ्यास न्यायालयाने सुनावली  ५ वर्षे सक्त मजुरी व १५०००रु दंडाची शिक्षा यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून अधिकारी व कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहेत 

याबाबत सविस्तर वृत्त असेकी

तक्रारदार यांचे मुलाचे नावे असलेल्या जमीनीमध्ये जाणेयेणेसाठी व मालाची वाहतुक करणेसाठी गट नं.५५६, मधील ०६ आर शेतजमीन खरेदी विक्री करण्याचा अहवाल लवकरात लवकर तहसिलदार पंढरपूर यांचेकडे पाठवून देण्यासाठी आलोसे यांनी ११,०००/- रु. लाचेची मागणी करून स्विकारणारे आरोपी लोकसेवक जगन्नाथ मारुती कुंभार वय ५७ वर्षे, पद-तत्कालीन मंडल अधिकारी, पटवर्धन कुरोली ता. पंढरपूर भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम कलम ७ नुसार ५ वर्षे सक्तमजुरी व १५००० रुपये दंड (दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सक्तमजुरी) आणि कलम १३ (१) (ड) सह कलम १३(२) नुसार ५ वर्षे सक्तमजुरी व १५,०००/- रुपये दंड (दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सक्तमजुरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.


तक्रारदार यांचे मुलाचे नावे असलेल्या जमीनीमध्ये जाणेयेणेसाठी व मालाची वाहतुक करणेसाठी गट नं.५५६, मधील ०६ आर शेतजमीन खरेदी विक्री करण्याचा अहवाल लवकरात लवकर तहसिलदार पंढरपूर यांचेकडे पाठवून देण्यासाठी आलोसे यांनी ११,०००/- रु. लाचेची मागणी केली होती. त्यावरुन तक्रारदार यांनी लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर येथे दिली असता, लाप्रवि सोलापूर कडुन. लाचेचा सापळा लावण्यात आलेला होता. त्यामध्ये वर नमुद आरोपीने लाच स्विकारल्यानंतर पकडण्यात आले होते.


त्यावरुन आरोपी आरोपी लोकसेवक जगन्नाथ मारुती कुंभार वय ५७ वर्षे, पद तत्कालीन मंडल अधिकारी, पटवर्धन कुरोली ता. पंढरपूर यांचेविख्द पंढरपूर शहर पो. ठाणे सो. ग्रा. गु.क्र. ३१३/२०१५ भ्र.प्र.का १९८८ कलम ७, १३ (१) (ड) १३ (२) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पो.उ. अधि. श्री. गणेश जवादवाड लाप्रवि, सोलापूर यांनी करन नमुद आरोपीविरुध्द मा. विशेष न्यायालय, पंढरपूर येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर केसची आज दिनांक ०५.०५.२०२६ रोजी सुनावणी मा. श्री. ओ. आर. देशमुख सो, जिल्हा न्यायाधीश-२, पंढरपूर यांच्या कोर्टात होवुन आरोपी लोकसेवक जगन्नाथ मास्ती कुंभार वय ५७ वर्षे, पद तत्कालीन मंडल अधिकारी, पटवर्धन कुरोली ता. पंढरपूर यांना वरील गुन्ह्यात दोषी ठरवुन त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ७ नुसार ५ वर्षे सक्तमजुरी व १५००० रुपये दंड (दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सक्तमजुरी) आणि कलम १३ (१) (ड) सह कलम १३ (२) नुसार ५ वर्षे सक्तमजुरी व १५,०००/- रुपये दंड (दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सक्तमजुरी) अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षा तर्फे सदर खटल्यात अॅड. श्री. सारंग वांगीकर तर आरोपी तर्फे अॅड. श्री सचिन पाटील यांनी काम पाहीले. प्रस्तुत प्रकरणामध्ये श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक लाप्रवि, पुणे व श्री. अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे. श्री. प्रशांत चौगुले, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, सोलापूर यांचे मार्गदर्शानाखाली कोर्ट पैरवी अधिकारी श्री. रविंद्र लांभाते, पोलीस निरीक्षक व कोर्ट पैरवी अंमलदार म्हणुन पोहवा/नागेश देशमुख, पोशि/सचिन राठोड, लाप्रवि, सोलापूर यांनी काम पाहीले आहे.


तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणारे लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणा-या खाजगी व्यक्तीबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ व व्हॉटस अॅप क्रमांक ९४०४००१०६४ वर संपर्क साधावा.

पोलीस उप अधीक्षक

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा