Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ५ मे, २०२६

*राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय-- तुळजापूर येथील मंदिर संस्थांच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिक महाविद्यालय महाराष्ट्र शासना कडे होणार हस्तांतरित!*

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*



मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये, आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठीचा निर्णय, सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी आणि श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी  महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना फायहा होणार असून आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळणार आहे.  

दुर्गम आणि डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण सुलभ व्हावे, यासाठी सरकारने आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीचा निर्णय घेतला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या ५ प्राथमिक शाळांची माध्यमिक स्तरावर, तर १९ माध्यमिक शाळांची कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर श्रेणीवाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची गळती थांबण्यास मदत होणार आहे. यासाठी आवश्यक पदनिर्मिती आणि खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी. सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय. प्रत्येकी साठ प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम. धाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास  हस्तांतरित करण्याचा निर्णय. महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार, अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा