*डॉ. सलीम सिकंदर शेख*
*श्रीरामपूर*
*9271640014*
साताऱ्याच्या मातीत नेहमीच संघर्ष, विचार आणि परिवर्तनाची परंपरा रुजलेली आहे. रयतेच राज्य म्हणून स्वराज्य निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्या परंपरेला च पुढे घेऊन जाणारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत इंग्रज सरकारच्या दडपशाहीला सडेतोड प्रतिकार करणारे प्रति सरकार चालवणारे क्रांतिकारी क्रांतिसिंह नानासाहेब पाटील, तसेच भारताला जगातील सर्वात विश्वसनीय असं आपल्या अपार कष्ट करून बनवलेल्या संविधान निर्मिती करणाऱ्या महामानव आदरणीय आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीं चे प्राथमिक शिक्षण ज्या प्रतापसिह शाळेत झाले ती पुण्यवान शाळेने किती भाग्यवान महामानव घडवलें अशी ती सातार ची शाळा, त्याच बरोबर बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत व माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढे बहुजनांना phd करील अशी शपथ घेणारे त्याच साठी आपलं सर्व जीवन खस्ता खाणारे कर्मवीर भाऊराव जीं पाटील यांच्या क्रांतिकारी सातारा भूमीत या सर्व महामानवाच्या कार्याला पुन्हा पुन्हा नवी उंची देणारे व क्रांतिकारी नाना साहेब पाटील यांच्या 125 व्या जन्म वर्ष्याच्या निम्मिताने १५ वे विद्रोही साहित्यक व संस्कृतीक संमेलन ९ व १० मे २०२६ रोजी सातारा येथे अत्यंत दिमाखात आणि वैचारिक ऊर्जेने पार पडले. हे संमेलन म्हणजे केवळ विचारमंच किंवा सांस्कृतिक उत्सव नव्हता, तर नव्या पिढीला सुव्यस्थीत चांगल्या सत्य इतिहास व सत्य विचाराची शिदोरी होती
साताऱ्याच्या मुख्य पवईनाक्या वरील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका ला पुष्पसुमनांनी अभिवादन करीत समतेची मशाल पदमश्री लक्ष्मण माने सहित जमलेल्या मान्यवरांनी पेटवून ,संविधानाची प्रत पालखीमध्ये ठेवून, समतेचा व एकते चा व छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जय कार करत रस्त्यावरील चौका चौकात जागोजागी असलेल्या विविध महामानवांच्या स्मारकांना पुष्पसुमन अर्पण करत ढोल ताशांच्या, लोकवादयाच्या कल्लोळात, टाळ मृदूंगच्या, चिपळयांच्या निनादात, हजारो घोषणाच्या आवाजात,डोक्यावर टोपी व कपाळावर टिळा लावून बाल वारकरी, तर काही डोक्याला कमरेला लाल पागोटे बांधून, तर काही बालगोपाल, तरुण तुर्क मंडळी, काहींनी वासुदेव होऊन, तर काहींनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून, काहींनी माँ जिजाऊ साहेबांची वेशभूषा, तर काही महात्मा ज्योतिबा फुले ची वेशभूषा तर मुलींनी क्रांतिज्योती सावित्रीबाईची वेशभूषा करून मिरवणुकीत सातारकरांचे लक्ष वेधले होतें, अकोले तालुक्यातील राष्ट्रपदी पदक विजेते बाबा गांगड यांच्या ढोल व आदिवासी बांधवांच्या जागोजागी केलेल्या उत्कृष्ट आदिवासी नूत्र्यप्रकाराने तर सातारच्या विद्रोही च्या रॅली ची उंचीत वाढ केली. रॅलीत, आदरणीय डॉ. भारत पाटणकर,पदमश्री लक्ष्मन माने,संमेलन अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत, संमेलन सहस्वागत अध्यक्ष ह. भ. प. डॉ सुहास महाराज फडतरे, संमेलन उदघाटक दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी च्या कुलगुरू डॉ. सोनाझरिया मिन्झ मॅडम, प्रा.डॉ.बाबुराव गुजर सर, कॉम्रेड किशोर जाधव, कॉम्रेड विजय मांडके, साथी मिनाज सय्यद, दिल्ली येथील जेंएनयु चे प्रोफ. डॉ शरद बाविस्कर , धुळे शहादा येथील कवी वाहरू सोनावणे, साथी नितीन पवार, प्रा.मंगला साठे, प्रा . कविता मेहत्रे, रायगड येथील उल्का महाजन , अहिल्या नगर चे प्रा . बापु चंदनशिवे ,( खुप मान्य वर होतें नावं माहित नसल्याने )..माननीय प्रा. डॉ. बाबुराव गुजर सरांनी मला खास बोलावून हातात हात घेऊन रॅलीमध्ये खुप वेळेप्रयत्न बरोबर घेतलं.
रॅलीत विद्रोही चे सचिव डॉ जालिंदर घिगे यांनी मायिक वर सतत घोषणाचा उदघोष करत मार्गदर्शन करत होतें. डॉ पुनम साबळे घिगे व त्यांच्या लेकीं बरोबर नाम फलक घेत पुढे चालत होतें..
विद्रोही रॅलीमध्ये विशेषता महिला, मुली व मुलांचा सहभाग विशेष वाख्यांना जोगा होता.
असंख्य विद्रोही सदस्य बरोबर श्रीरामपूर हुन डॉ. सलीम सिकंदर शेख, अध्यक्ष अशोकराव दिवे सर, ऍड. अमोल सोनावणे, शाहीर भीमराव कदम, कवी ऍड. अण्णासाहेब मोहन, विजय जगताप, संतोष त्रिभुवन, सिद्धार्थ दिवे, सातदिवे बाई, इंजिनीर कु.शिवानी दिवे, कु. सातदिवे.. राहुरी चे महेश साळवे. अकोले आदिवासी बांधवाची फौजच होती.. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातुन सदस्यांनी विद्रोही रॅली मध्ये सामील होत मान्यवरा सह घोषणाचा आनंद घेत 12=30 ला विद्रोही रॅली संमेलन ठिकाणी " कला व वाणिज्य महाविद्यालय मैदान शुक्रवार पेठ " त घूमधडयाक्यात विद्रोही झेंडे मिरवत, कल्लोळ करत,
विद्रोही गीत गात, धुळे शिरपूर येथील जागर मंच नें "
" जागं असावं.. भीमाचं पिल्लू जागं असावं..... " या गीता वर नवतरुणांनी ठेका धरत मनमुराद अस्वाद घेतला..
विचारपिठावर मान्यवरांनी फुले-शाहू-आंबेडरवादी विचार मांडली, पुरोगामी दुष्टीकोनातून सामाजिक, संस्कृतीक आणि राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस किती धोकादायक होत चालला, सामान्यांच्या अस्तित्वावर किती संकट निर्माण झाले आहेत, अशा बिकट परिस्थिती मध्ये परिवर्तनवादी शक्तींनी जनतेमध्ये जावून त्यांच्या विरोधात नव्या संघर्शाची दिशा उभी करून फुले शाहू डॉ.आंबेडकर या महामानवांच्या विचाराचे विचारपरिवर्तन करण्यासाठी सतत मेहनतची तय्यारी ठेवावी. असा बहुतेक मान्यवरांचा सुर होता.
आजच्या 15 व्या विद्रोही सांस्कृतिक संमेलन अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत नीं, सध्याच्या व्यवस्थेवर जोरदार हल्ला बोल केला, देशातील लोकशाही कुमकुवत होत आहेत, भीती दडपशाही आणि अराजकतेचे वातावरण निर्माण झालें आहेत, विचार मांडणाऱ्यावर हल्ले होत आहेत, त्यांना देशद्रोही म्हटलं जातंय हें चुकिचे आहेत. हें हल्ले होत असतांना समाजाने शांत राहणं हें धोकादायक आहेत. दाभोलकर कुलबर्गी, पानसरे यांच्या हत्या सामाज्याला दिसल्या पण सामान्यांचे दैनंदिन संघर्ष, अन्याय कुणाला लक्षात येत नाहीत, दिसत नाहीत म्हणून त्याकडे आता उरलेल्यानीं एकत्र येऊन त्याच्या प्रतिकाराची चळवळ उभी केली पाहिजेत व आपली वैचारिक प्रतिके आणि परिवर्तनवादी मूल्य आज जपली नाही तर उदया अधिक अंधार गडद होईल असा इशारा देऊन मी आता रस्त्यावर उतरणार आहेत.
दिल्ली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या प्रा. डॉ. सोनझारिया मिन्झ यांनी महाराष्ट्रच्या परिवर्तनवादी परंपराचा गौरव करून आदिवासी समाज अजूनही दूर दूरच असल्याची खन्त व्यक्त करून त्यासाठी या मातीतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतीबा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीं क्रांतीची बीजे पेरली आहेत ती शोषितां साठी एक नव्याने लढाई लढून चळवळ -संघर्ष -उभा करून परिवर्तनाची लढाई लढवी लागेल. त्यांनी खुप चांगल्या प्रकारे विविध उदाहरण देऊन आपली बाजू स्पष्ट केली.
माजी विद्रोही संमेलन अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शेतकरी प्रश्न, आत्महत्या, आणि जमिनीच्या भुसंपादनावर भाष्य करून सध्याचे सरकार लोकशाहिवरील दबाब वाढत आणुन जन आंदोलनाची ताकत कमी करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जन आंदोलन जोरदार उभारले पहिजेत. चळवळी भक्कम करण्याची गरज आहेत.
दुपारच्या परिसंवादात" छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी घडविलेल्या मराठी धर्म " यावर दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी " छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य भावनिक स्थरावर नं मांडता ते तत्वज्ञानात्मक आणि वैचारिक पातळीवर मांडण्याची क्षमता आपण निर्माण करायला हवी. आणि जोपर्यंत आपण आपल्या महाराजांच्या विचारांना या बौद्धिक उंचीवर नीट घेऊन जात नाहीत तो पर्यत आपल्याला त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने समजणार नाही".
"असं स्पष्ट मत प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी व्यक्त केलं, ते पुन्हा विषयावर बोलतात कीं, " ,छत्रपती नीं घडवलेला मराठी धर्म हा मूळता विद्रोही परंपरेतुनच उभा राहिलेला आहेत. मानवीकरण व जनावरीकरण या दोन्ही परस्परविरोधी प्रक्रिया समाजात आज सुरू आहेत. मेंदूचा वापर बिल्कुल नं करता केवळ गुलामी स्वीकारनें हें जनावरीकरणाचेच लक्षणे असुन या विरोधात विद्रोही साहित्यानें मानवी मूल्यांची भक्कम अशी मांडणी करणं अत्यन्त आवश्यक आहेत."
पंढरपूर येथील भारत महाराज जाधव कैकाडी यांनी आपल्या संवादात म्हटले कीं, " वैचारिक प्रवास समजून घेणं गरजेचं आहेत, मानवी उत्क्रांती चा जेंव्हा पासून प्रवास सुरू झाला तेंव्हा पासूनच विद्रोहीचा प्रवास सुरू झाला आणि तो भविष्यातही चालूच राहणार आहेत. आजच्या काळात अनेक लोकांना संत तुकाराम महाराज नीट समजलेलें नाहीत. खरच ही खेदाची बाब म्हणावी लागेल. संत स्वराज व संविधान ही त्रिसूत्री म्हणजेच आपला खरा मराठी धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत स्वराज्याचे बीज पेरलेत तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपाने त्याचे रक्षण करून त्याची फळं मिळवून दिली, हा वैचारिक प्रवास आपण समजून घेतला पहिजेत.. अशी कळकळीची भावना आपल्या छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांनी घडविलेला मराठी धर्म " यावर आपलं मत ह. भ. प. भारत महाराज कैकाडी नीं व्यक्त केलं.
त्याच परीसंवाद मध्ये " मराठी धर्म " वर" समतेचा विचार नव्याने मांडण्याची गरज आहेत "असें रायगडचे सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणतात कीं," मध्ययुगीन भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हें पहिले लोककल्याणकारी राजा होतें, ज्यांनी सामान्य रयतेसाठी स्वतःचे प्राण अर्पण करण्याची जिद्द बाळगली होती, जेंव्हा लोकशाहीची संकल्पना जगात कुठेही प्रबळ नव्हती त्या काळात महाराजांनी रयतेच्या स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. तर आजचे सत्ताधारी भय भूक आणि भेदाचे राजकारण करत फक्त्त केवळ खुर्च्या उबवत आहेत. अठरा पगड जातींना सोबत घेत जाती व्यवस्था मोडीत काढणारा छत्रपती शिवराय आणि छत्रपती शाहू महाराजांनीं दिलेला समतेचा विचार आजच्या काळात नव्याने मांडण्याची अत्यन्त गरजेचं आहेत ही आजच्या काळाची गरज आहेत. असं स्पष्ट मत अधोरेखित केलं."
संध्याकाळच्या सत्रात, निमंत्रीतांच्या कवी संमेलनात प्रसिद्ध दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी कांबळे या कवितेतुन उत्कृष्ट समाजप्रबोधन करून श्रोत्यांना पोट धरून हसवलं व त्याच कवितेतून समाजात सामान्य लोकांना कसं सतवलं जातं, त्रास दिला जातोय याचं आपल्या कांबळे कवितेतून उदाहरणा सह प्रबोधन केलं. आजून बऱ्याच कविनी आपल्या विद्रोही कविता सादर केल्या.
त्याच सत्रात, तरुणांई चा आवाज मध्ये " पुरोगामी महाराष्ट्राचा विद्रोही रॅप " मध्ये पुणे येथील Mc Socialist पुणे च्या अनिकेत कांबळे नीं उत्कृष्ट रॅप सादर करून संस्कृतीक प्रबोधनाचा एक जल्लोषपुर्ण कार्यक्रम सादर करून आजच्या जमान्यात सत्ताधारी जमात कशी भीती घालून लोकांना छळतेय म्हणून त्यांना तोंड कसं दिले पाहिजे याचं प्रबोधन केलं.
संमेलनातच रात्रीं," विश्ववंदनीय राजे, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला " हें अतिशय प्रसिद्ध असं नाटक सादर झाले, निर्माता :- राहुल भंडारे, दिग्दर्शन :- कैलास वाघमारे व संभाजी तांगडे, व संकल्पना गीत :- लोकशाहीर संभाजी भगत..
यांनी मेहनतीने बसवलेले हें नाटक तर मी आज पर्यत वाचलेल्या, पाहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे खुरे चरित्र व महाराज कसे होतें, महाराजांचे विचार काय होतें हें आज हें नाटक बघून तेथे हजर असलेल्या चार पाच हजार प्रेक्षकांना निच्छित समजले असतील असं मी खात्रीने सांगू शकतो.
दुसऱ्या दिवस 10-05-2026
सकाळी भिम जलसा झाला त्यामध्ये आमच्या श्रीरामपूर च्या शाहीर भीमराव कदमानी तर जिंकूनच घेतलं, त्यामध्ये विजय जगताप, कवी ऍड. अण्णा मोहन व सातपुते मॅडम यांनीं निर्विवाद साथ दिली . बरेच, शेषण झाले , ते सर्व अफाट झाले,त्यामध्ये महिला, मुली, मुलांचा सहभाग प्रामुख्याने होता, प्रत्येक मान्यवरांनी विद्रोही सदस्यांचे उत्कृष्ट प्रबोधन केलं. परीसंवाद झालें त्यामध्ये ग्रुप चर्चा उत्कृष्ट पद्धतीने झालें.
सायंकाळी विद्रोही संस्कृतीक चळवळीचे अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव नी बरेच प्रस्ताव मांडली त्या सर्वांना सर्व मान्यवर विद्रोही सदस्यांनी होकार देऊन पास ही केलं.
संध्याकाळीच प्रसिद्ध सिनेकलाकार, उत्कृष्ट वक्ते, प्रबोधनकार किरण माने नीं आपल्या मेहनतीने सजवलेले व प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या दुर्बीणीतून पाहिलेले एतिहासिक नाटक अर्थात " स्टोरी शिवराज्याभिषेकांची "
महाराष्ट्राने डोक्यात घेतलेलं नाटक म्हणजे खरा खुरा सच्चा इतिहासात रमुन गेलोत असं वाटतं..
आमची श्रीरामपूरची विद्रोही संस्कृतीक चळवळीची टीम खुप उत्साहनें सातारा च्या 15 व्या संमेलनात सामील झाली त्या सदस्यांच्या तोंडून संमेलन बद्दल व्हावाच ऐकायला मिळाली, प्रयेक गोष्टीचे आती सूक्ष्म नियोजन बघावंयाला भेटत होतं. ते बघून आम्हाला वाटतं होतं कीं ही मंडळी किती भारवलेली, आपलं सर्वस्व अर्पण करून एका दिलाने कामं करीत आहेत..
संमेलनात खुप मान्यवरा बरोबर ओळख झाली, एकमेकांच्या मोबाईल नंबर ची घेवाण देवाण झाली.
@@ संमेलनाच्या नियोजनां बद्दल @@
चार पाच महिन्यापासून विद्रोही चळवळीतील सदस्य, प्रामुख्याने प्रमुख सदस्य दिवस रात्रं महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात संदेश देत कार्यक्रम करत फिरत होतें,त्या सर्वांचे मेहनतीचे फळं म्हणजे साताऱ्यातील 15 व विद्रोही संमेलन...
साताऱ्यातील कार्यक्रमाचे नियोजन म्हणजे साताऱ्यातील जिद्दी, मेहनती आणि विचारांनी भारलेली तरुण मंडळी. गेल्या सहा महिन्यांपासून दिवस-रात्र विसरून, स्वतःचे सुख-दुःख बाजूला ठेवून, फक्त ‘विद्रोही’चा विचार डोळ्यासमोर ठेवून राबणाऱ्या या तरुण सैनिकांनी ‘उत्कृष्ट टीम’ म्हणजे काय, याचा एक रोल मॉडेल आदर्श उभा केला आहे.
प्रत्येक कामगिरीत त्यांचे सूक्ष्म नियोजन आणि अथक कष्ट दिसून आले. संमेलनात आलेल्या कोणत्याही सहभागीला कसलीही कमतरता जाणवू नये, याची त्यांनी तळमळीने काळजी घेतली. पाहुण्यांचे स्वागत, निवास, भोजन, सभागृह-व्यवस्थापन, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक, पुस्तक प्रदर्शन, पार्किंग, तांत्रिक व्यवस्था – अशा प्रत्येक बाबतीत त्यांचा जीव ओतलेला हार्डवर्क स्पष्टपणे दिसत होता. मनोमन प्रश्न पडायचा : एवढी मेहनत करूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा का नव्हता? उलट, ‘विद्रोही’च्या विचारासाठी काहीतरी मोठे करण्याचा अभिमान आणि कर्तव्यनिष्ठेचा प्रखर प्रकाश त्यांच्या डोळ्यात दिसत होता.
मला प्रत्येक छोट्या छोट्या प्रसंगाची आठवण येते. विचारमंचावर जमलेले श्रोते आणि वक्ते यांना ताप्त उन्हाच्या तडाख्यापासून गारवा मिळावा म्हणून ही तरुण मुले-मुली स्वतः हातात बादल्या घेऊन कूलरमधील पाणी सतत बदलत होती. गटचर्चेत खंड पडू नये म्हणून त्याच ठिकाणी, चर्चा सुरू असताना, गरम चहाची सोय केली जात होती. प्रवेशद्वारावर बसलेली मुले प्रत्येक येणाऱ्याचे जणू आप्तेष्टांसारखे, अगदी आपुलकीने स्वागत करत होती; आणि संघर्षनिधीसाठी विनंती करताना त्यांच्यात एक अढळ तळमळ दिसून येत होती.
रात्री कार्यक्रम संपल्यावर मंडपात पडलेले पेपर, रिकामे बाटल्या, कचरा – हे सर्व साफ करताना ही मुलं रात्री १-२ वाजेपर्यंत थांबली. ही मुले केवळ कार्यकर्ती नव्हती, तर विद्रोहाचा विचार प्राणापलीकडे वाहणारी अनामिक सैनिक होती. ती फक्त काम करत नव्हती, रबत होती.
देशाच्या विविध भागातून आलेले साहित्यिक, विचारवंत, कलावंत आणि कार्यकर्ते साताऱ्याच्या या ‘बटालियन’च्या कामाने भारावून गेले. ‘शिवाजी अंडरग्राउंड’चा प्रयोग, ‘द किरण माने शो’ एवढे प्रभावी झाले की लोकांना उभे राहून कार्यक्रम पहावा लागला. तरीही कोणाच्याच चेहऱ्यावर नाराजी नव्हती, कारण संपूर्ण वातावरणात एक वेगळीच तमन्ना, आपुलकी आणि संघर्षशील संस्कृतीचा जिवंत स्पर्श होता.
आजच्या या काळात जिथे माणूस स्वतःच्या करिअर, स्वतःच्या आयुष्यापुरताच मर्यादित राहतो, तिथे साताऱ्यातली ही तरुण मुले आणि मुली मात्र समाजपरिवर्तनाच्या विचारासाठी ‘निःस्वार्थ’पणे झटताना दिसली. त्यांनी सिद्ध केले – विद्रोह हा फक्त घोषणांमध्ये उगवत नाही, तो कृतीत, समर्पणात, सामूहिक जबाबदारीत, शिस्तीत आणि प्रचंड संयमात बहरतो.
साताऱ्याच्या या तरुणांनी केवळ एक संमेलन यशस्वी केले नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीला एक नवी दिशा, नवा आत्मविश्वास आणि दमदार सांस्कृतिक सैनिक दिले आहेत. त्यांच्यामुळे हे संमेलन केवळ एक कार्यक्रम राहिला नाही, तर ते ‘विद्रोही’ चळवळीचे एक केंद्रस्थान बनले आहे. येत्या काही वर्षात आपल्यातीलच काही डॉ.भारत पाटणकर, आ.ह तात्या साळुंखे, कॉ.धनाजी गुरव, डॉ. बाबुराव गुरव, शाहीर संभाजी भगत, प्रा. गौतम काटकर,प्रा.विजय मांडके डॉ जालिंदर घिगे सारखी व्यक्तीमत्व, दशकानंतरच्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये आपल्यातीलच एखादा संमेलन अध्यक्ष म्हणून आम्हाला पाहावयास मिळेल अशी उमेद आहे..
या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक जोमाने राबणाऱ्या तरुणाला, आणि संपूर्ण संयोजन समितीला...खरंच सलाम!
तुमच्या सर्वांच्या अथक श्रमांमुळे ‘विद्रोही’चा झेंडा अधिक उंच फडकला आहे.
विद्रोही सलाम...
शब्दाकन :- डॉ. सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा दवाखाना.
अध्यक्ष श्रीरामपूर विद्रोही संस्कृतीक चळवळ
श्रीरामपूर
9271640014.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा