Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २ मे, २०२६

*साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून! नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला!*

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


नसरापूर (ता. भोर) : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निरागस बालिकेवर ६० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे खून केला. संतापलेल्या ग्रामस्थांनी आरोपीला पोलिस ताब्यात देण्यापूर्वी 'आमच्या ताब्यात द्या' असा अल्टिमेटम देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली आणि पुणे-सातारा महामार्ग सुमारे दोन तास रोखला. 

पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप गिल यांनी सांगीतले ही केस फास्ट ट्रॅक वर चालवता येईल, १५ दिवसांच्या आत आम्ही केसची चार्ज शीट करून लवकरात लवकर याचा निपटारा करण्यासाठी पुढाकार घेत आहोत या कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतरच ग्रामस्थांनी महामार्ग मोकळा केला.
                   :-----👇👇 जाहिरात-----:👇👇




या दुर्दैवी घटनेत साडे तीन वर्षे बालिकेची हत्या भिमराव कांबळे (वय ६० वर्षे, रा. साळवडे, ता. भोर) या नराधमाने केली. ही बालिका तिच्या आजोळी आलेली असताना गुरांच्या गोठ्यात नेऊन त्याने तिचेवर लैंगिक अत्याचार करून तिला गोठ्यात हत्या केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ग्रामस्थांनी आरोपीला शोधून पोलिसांच्या ताब्यात दिला. मात्र, पोलिसांनी बालिकेची शहानिशा करण्यासाठी तिला हलवताना ग्रामस्थांना कळवले नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी तीव्र आंदोलन सुरू केले आणि नंतर पुणे-सातारा महामार्गावर मोर्चा काढत दोन तास वाहतुक ठप्प केली. रात्री साडे नऊ नंतर महामार्गावर वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ग्रामस्थांनी 'नराधमास आमच्या ताब्यात द्या, कडक शिक्षा व्हावी' असा जाहीर घोषणाबाजी करत आंदोलन केले.या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी होत्या. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक गिल यांनी घटनास्थळी धावत येऊन संशयिताविरुद्ध फास्ट ट्रॅक न्यायालयात गुन्हा दाखल करून १५ दिवसांत कडक शिक्षा देण्याचे आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी महामार्ग मोकळा केला. ही घटना भोर तालुक्यातील समाजात संताप आणि भीती निर्माण करणारी आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, फास्ट ट्रॅक न्यायप्रक्रियेला गती देण्यात येईल अशी आशा आहे.

साडे तीन वर्षांच्या अशा पद्धतीने अत्याचार होणे, ही माणुसकीला काळीमा फासनारी घटना आहे. याचा करावा तेवढा निषेध कमीच ठरेल . या आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा कमी पडेल असे एका महिलेने आपले मत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा