Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ७ मे, २०२६

करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील वरदायिनी ठरणाऱ्या कोळगाव धरणात फक्त 21 टक्केच पाणीसाठा

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या करमाळा तालुक्यातील आवाटी जवळ असणाऱ्या सीना कोळेगाव धरणाच्या पाण्याची पातळी बाष्पीभवनाने दिवसेंदिवस घटत असून धरणात अवघ्या 21% पाणी साठा राहिला आहे धरणात शिल्लक राहिलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वापर करावे असे आवाहन संबंधित कोळगाव धरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे



करमाळा तालुक्यातील विशेषता पूर्व भागातील वरदायिनी ठरलेल्या कोळगाव धरणाचे पाणी सध्याच्या कडक उन्हामुळे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे धरणात सध्या 21.48% पाणी शिल्लक आहे तापमानातील वाढत्या बदलामुळे सदरचे पाणी दिवसेंदिवस बाष्पीभवनामुळे कमी होत चालले आहे करमाळा तालुक्यातील विशेषता पूर्व भागातील हिसरे, हिवरे, निमगाव कोळगाव आवाटी, नेरले, सालसे, गौंडरे बोरगाव, दिलमेश्वर आदी भागातील शेतकऱ्यांना या धरणाचा मोठा फायदा होतो 

सध्या तापमानातील उच्चांकामुळे कोळेगाव धरणातील पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले असून याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीवर भविष्यात होऊ शकतो यामुळे शेतकऱ्यांनी सदर धरणातील पाणी योग्यरीत्या नियोजन करून वापरावे असे आवाहन संबंधित सीना कोळेगाव प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा