*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, करमाळा
इ. १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असुन महाविद्यालयाचा निकाल – 99.35% लागला आह
या वर्षी इ. १२ वी बोर्ड परीक्षेस एकूण ३०८ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ३०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ
कुमारी हर्षदा हनुमंत जमदाडे
८७.३३% गुणांसह प्रथम क्रमांक
कुमारी वैभवी उमेश पवार
८३.००% गुणांसह द्वितीय क्रमांक
कुमारी प्रणिती पोपट मोहोळकर
८३.००% गुणांसह द्वितीय क्रमांक
कुमारी स्नेहल भाऊसाहेब शिंदे
८२.३३% गुणांसह तृतीय क्रमांक
विशेष अभिमानाची बाब
कुमारी मंगल गोपीनाथ कोंडलकर हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. जयवंतराव जगताप , विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, विश्वस्त माजी उपनगराध्यक्ष नारायणबापू जगताप, विश्वस्त युवा नेते शंभूराजे जगताप, तसेच प्राचार्य बी. के. पाटील, उपप्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक एम. आर. कांबळे, पर्यवेक्षिका सौ. सुनिता नवले, विज्ञान शाखा विभाग प्रमुख व्ही. एल. पवार , तसेच उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
उज्ज्वल भविष्यास हार्दिक शुभेच्छा!





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा