*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायतने तेथील औद्योगिक वसाहतींमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त नावाजलेल्या कंपन्यांनी त्यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या थकीत करासंदर्भातील कराची वसुली जप्ती कारवाई ग्रामपंचायत अधिनियम १९५९/१९६० चे कलम १२९ (४) व महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासहिंता २०११ प्रकरण ८ अ व इतर सर्व शासकीय आदेशांतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तामलवाडी चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी महाराष्ट्रदिनी म्हणजे ०१ मे २०२६ रोजी पंचायत समिती तुळजापूर येथे लाक्षणिक उपोषण केले होते त्यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी अशोक काळे यांनी लेखी पत्र देऊन अशवस्त केले होते की, सदरील औद्योगिक वसाहतीची तत्काळ जप्ती करून यथाशीग्र तीन आठवड्यांमध्ये कर वसुली केली जाईल असे आश्वास्त केले आहे,
त्याप्रमाणे कार्यवाही नाही झाल्यास माजी सैनिक शिवाजी सावंत पुढील आंदोलन जिल्हा परिषद धाराशिव समोर करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी यांना लेखी पत्र देऊन सांगितले आहे त्याप्रसंगी गटविकास अधिकारी (पंचायत) श्रीमती नाईक, कावळे, कोटे, कक्षाधिकारी ऋषिकेश पिंपळेकर, साहाय्यक कक्षाधिकारी पांडगळे, आरोग्य सेवक भिंगडे, दिलीप शितोळे घरकुल विभाग, नाईकवाडे, भंडारपाल पंचायत समिती तुळजापूर, लिपिक बावणे व सोनटक्के, पोलिस कर्मचारी राजेंद्र चौगुले, उद्धव गिरी आदी उपस्थित होते त्यानुसार एका माजी सैनिकास महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला कर वसुली करण्याबाबत एक सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनाने आंदोलक शिवाजी सावंत यांना कळवले आहे, याबाबत सावंत यांनी समाधान व्यक्त केले व प्रशासनाचे व ज्या पत्रकार बांधवांनी त्यांची आवाज प्रशासनास पोहचवण्यासाठी सहकार्य केले त्यांचे आभार मानले आहेत व वसुलीकरिता जप्तीची ची कारवाई तत्काळ करा अशी प्रशासनास विनंती केली आहे त्यामुळे तामलवाडी परिसरात सर्व ग्रामस्थांकडून महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येस माजी सैनिक श्री सावंत यांनी लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनाचे कौतुक करण्यात येत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा