*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
आज ग्रामपंचायत निंभोरे येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत चे ध्वजारोहण निंभोरे गावातून पहिलीच महिला पोलीस भरती झालेल्या कु. ज्ञानेश्वरी अमोल काळदाते यांचे हस्ते करत सरपंच रविंद्र वळेकर यांनी एक नवीन पायंडा पाडला.यातून बाकी इतर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी यातून स्पर्धा परीक्षा कडे लक्ष द्यावे. मुलांची प्रगती व्हावी. यासाठी सरपंच रविंद्र वळेकर यांनी स्वतः ध्वजारोहण न करता प्रत्येक वेळी यशस्वी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून एक नवीन प्रयोग केला आहे.याचा फायदा व बदल गावात होताना दिसत आहे. गावातील मुले स्पर्धा परीक्षेकडे वळताना दिसत आहेत. भरपूर विद्यार्थी यशस्वी देखील होत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा