Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १७ मे, २०२६

रिटेवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच पदी सौ. केशराबाई बापू रिटे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


रिटेवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच पदी सौ. केशराबाई बापू रिटे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला





रिटेवाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकसेवेसाठी सौ. केशराबाई बापू रिटे यांची सरपंच पदी निवड झाल्याचे समजताच, करमाळा तालुक्याचे युवा नेतृत्व, खरेदी विक्री संघाचे  चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक मा. श्री. शंभूराजे जगताप यांनी सौ. रिटे यांची भेट घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला व त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.






"नेतृत्व लोकाभिमुख असावे आणि विकास तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा, हाच आमचा ध्यास आहे."

याप्रसंगी गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच सौ. केशराबाई बापू रिटे यांच्या नेतृत्वाखाली रिटेवाडी गाव विकासाचे नवे शिखर गाठेल, हा ठाम विश्वास आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा