*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील निमगाव (ह) येथील धरणग्रस्त शेतकरी बांधव गेल्या २७/२८ वर्षा पासून भू संपादन झालेल्या शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा म्हणून सतीश नीळ यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने संघर्ष करत होते, यास अखेर यश मिळाले असून हे काम मार्गी लावण्यासाठी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा व जिल्हा परिषद गट नेत्या रश्मी दिदी बागल, भाजपा युवा नेते दिग्विजय बागल यांनी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ यांना सोबत घेऊन अनेक वेळा जिल्हाधिकारी सोलापूर ,पालकमंत्री ना. जयकुमार गोरे साहेब, जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केला होता.तसेच शेतकऱ्यांच्या वतीने कायदेशीर लढा लढत असताना अँड सूर्यकांत सरडे यांनी ही अत्यंत काळजी पूर्वक लक्ष घालून या धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लाख मोलाचे काम केले आहे.याचाच परिपाक म्हणून आज ९ कोटी ६१ लाख ९१ हजार रुपये निधी मंजूर होऊन त्याचा धनादेश उपविभागीय अधिकारी माढा कुर्डुवाडी यांचे प्रतिनिधी तथा तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे मॅडम यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी रश्मी दिदी बागल,अँड सूर्यकांत सरडे, तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन विशेष सन्मान करून ऋण व्यक्त करण्यात आले.या प्रसंगी श्री मकाई सह. साखर कारखाना चेअरमन दिनेश भांडवलकर, संचालक रामभाऊ हाके, संचालक व भाजपा मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ, नगरसेवक दीपक चव्हाण, विजयराव लावंड, धरणग्रस्त शेतकरी प्रकाश नीळ, आंबऋषी भील, धर्मराज जगताप, लक्ष्मण रोकडे,दत्ता साळूंके, धनंजय नीळ, निमगाव चे माजी चेअरमन अतुल नीळ, राजेंद्र भील,विष्णु नीळ, कालिदास नीळ, सोमनाथ जगदाळे, हनुमंत अतकरे, विकास रोकडे,सुदाम साळुंके, इत्यादी धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
चौकट
गेल्या २७/२८ वर्षा पासून लढा सुरू होता त्यास ग्रामीण विकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल, युवा नेते दिग्विजय भैय्या बागल यांचे मोलाचे सहकार्य व मदत मिळाली असून आमचे कायदेशीर सल्लागार अँड. सूर्यकांत सरडे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व त्यांच्या प्रयत्नांनी यश मिळाले आहे.
सतीश नीळ
अध्यक्ष
सीना कोळेगाव धरणग्रस्त संघटना




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा