*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
*पत्रकार---सांगली*
*मोबाईल - 8983587160*
*प्रेषित मोहम्मद पैगंबर* यांचा आदर्श आणि *इमाम हसन - हुसेन* यांची "शहादत" प्रमाण मानून जगातील "मुस्लिम बांधव" मार्गक्रमण करत असतो. नेहमीप्रमाणे सांगलीच्या सुप्रसिद्ध *"ईदगाह मैदानावर"* बकरी ईदची नमाज मोठ्या उत्साहात "अदा" करण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील सांगली शहरात *समस्त मुस्लिम समाज* सांगलीच्या माध्यमातून *गोवंश हत्या बंदी* प्राध्यान्यक्रमाने पाळली जावी,
*हिंदु - मराठा* बांधवाच्या भावनेचा सन्मान व्हावा, *सर्वधर्मसमभाव* "कृतीतून" सिद्ध व्हावा या दृष्टीने सांगलीत बहुजन समाजाचे नेते *असिफ बावा, व युनूस महात* यांच्या पुढाकाराने बकरी ईद निमित्त मुस्लिम समाजाने *गायीची खरेदी* करू नये, "गोवंश हत्त्या" होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात *प्रबोधन* करण्यात आले.
विविध *पोस्टर* लावून, *समाजमाध्यमवर* आवाहन करून एवढेचं नव्हे तर ज्या *जनावरांच्या बाजारात* हे गोवंश येते त्या बाजारात जाऊन त्याची विक्री करणाऱ्या *विक्रेत्यांचे प्रबोधन* करण्यात आले. व त्यांना गायी विक्री पासून "परावृत्त"करण्यात आले. *सलीम पन्हाळकर , अक्रम शेख* यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यानी यावेळी सहभाग घेतला.
आज *जातीयवाद* ची विषवल्ली फोफावत असताना, *वाळवंटातील ओशियस* ..अर्थात वाळवंटातील *हिरवळ - झाडी* याप्रमाणे, सांगलीत जातीयवाद्यांच्या "विषवल्लीला", सर्वधर्मसमभाव आणि "शांततावृत्तीने" दिलेले बंधुभावाचे हे 'शीतल" उत्तर अभिनंदनीय, *आदर्शवत* आणि कौतुकास्पद आहे. *संपूर्ण भारतातील* जनतेने याचे "अनुकरण" करणे अत्यावश्यक आहे.
*हिंदु - मराठा -मुस्लिम* हे एक अनमोल *हिऱ्याच्या माळेतील* मोत्यांप्रमाणे आहेत. मराठा बांधव हा मुस्लिमांचा *बंधू* आहे - भाऊ आहे. सुखदुःखाचा *सखा - सोबती* आहे. त्यामुळे एकमेकांच्या इच्छा - अनेच्छा याचा आदर *"दोन्हींकडून"* व्हायलाच हवा.
आज सांगलीत *गोवंश हत्या बंदी* साठी झालेल्या प्रयत्नांची दखल "भारतातील" *सोशल मीडिया -प्रिंट मीडिया* यांनी घेणे आवश्यक आहे.कारण *"सर्वधर्मसमभाव"* हिच काळाची गरज आहे,आणि प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची आदर्श *जीवनपद्धती* मुस्लिमांसाठी उपयुक्त आणि *उपकारक* आहे. पुनःश् सांगलीतील मुस्लिम समाजाच्या आधुनिक आदर्श विचासरणीचे अभिनंदन !🌹🌹🌹
आ. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार*)
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा