Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २८ मे, २०२६

महारोजगार मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद--या महारोजगार मेळाव्यात 690 पेक्षा अधिक युवकांनी सहभाग नोंदवला ,295 युवकांची निवड ,जिल्हा आणि बाहेरील एकूण 41 कंपन्या चा सहभाग

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448



सोलापूर, दि. 28 मे 2026 : रोटरी क्लब ऑफ सोलापूर, इक्विटास डेव्हलपमेंट इनिशियेटिव्ह ट्रस्ट व महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सोलापूर येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




सदर रोजगार मेळाव्यामध्ये सोलापूर येथील प्रिसिजन कॅमशाफ्ट, लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेड, यशस्वी अकॅडमी स्किल, आहेरकर बजाज ऑटोमोबाईल्स, भागवत असोसिएट्स, पी. पी. पटेल मेटल पावडर प्रायव्हेट लिमिटेड, गुरुदत्त एंटरप्राइजेस, मोंढे उद्योग समूह आदी नामांकित कंपन्यांसह नजीकच्या जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. जिल्हा व जिल्हाबाहेरील मिळून एकूण 40 कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.
या मेळाव्यामध्ये दहावी पास/नापास, आयटीआय उत्तीर्ण, डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सर्विस सेक्टर, बँकिंग सेक्टर, उत्पादन क्षेत्र, विमा कंपन्या, हॉस्पिटल्स, केमिकल उद्योग इत्यादी विविध क्षेत्रातील आस्थापनांचा या मेळाव्यात समावेश होता.
सदर रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सोलापूरचे महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सोलापूरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रोटरी संस्थेचे अभिनंदन केले.



रोटरीच्या अध्यक्षा सौ. धनश्री केळकर यांनी “रोटरी करिअर कनेक्ट” या प्रकल्पाची घोषणा केली. तसेच महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूरचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. मनोज बिडकर यांनी उमेदवारांना सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा व सोलापूरच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
या महारोजगार मेळाव्यासाठी 690 पेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. ज्यामध्ये 295 उमेदवाराची निवड झाली
सदर कार्यक्रमास रोटरीच्या अध्यक्षा सौ. धनश्री केळकर, सचिव निलेश फोफलिया, शिवाजी उपरे, सलाम शेख, शांता येळंबकर, निशांत डागा, आकाश बाहेती, संतोष कणेकर, ब्रिजकुमार गोयदानी, माजी प्रांतपाल झुबीन अमारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा