Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १५ मे, २०२६

इंदापूरचे माजी नगराध्यक्ष, पँथर रत्नाकर मखरे यांना स्मृतिदिनी अभिवादन, यानिमित्त त्रिशरण, पंचशील पठण.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९



इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष, दिवंगत पँथर रत्नाकर मखरे ऊर्फ तात्या यांचा पाचवा स्मृतिदिन गुरुवार दि.१४ मे रोजी भिमाई आश्रमशाळेत संपन्न झाला.

यावेळी बौद्धाचार्य गौतम जगताप यांच्या हस्ते व आयु. शकुंतला रत्नाकर मखरे, ॲड. राहुल मखरे, संतोष मखरे, ॲड. समीर मखरे व कुटुंबीयांच्या उपस्थितीत मखरे यांच्या समाधीस्थळी त्रिशरण, पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी माऊली नाचण, नानासाहेब चव्हाण, ॲड. राहुल मखरे यांनी दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.



यावेळी गोपीचंद गलांडे, विलास शिंदे, डॉ. अमोल उन्हाळे, हमीद आतार, महादेव चव्हाण, महावीर वजाळे, गोरख तिकोटे, रवी चव्हाण, अश्वजीत कांबळे, दयानंद वाघमारे, सत्यवान भोसले, विजय खामगळ, गणेश चंदनशिवे, जेष्ठ पत्रकार शैलेश काटे, तेजस मखरे, सूरज धाईंजे, नागेश भोसले, शितल पलंगे, शिवाजी शिंदे तसेच महिला भगिनी, संस्थेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी दिवंगत मखरे तात्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी तर आभार साहेबराव पवार यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा