Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १५ मे, २०२६

वधू-वर परिचय स्नेहमेळावा ही काळाची गरज, रविवार दिनांक १४ जून रोजी पुण्यात सुरुवात तर त्यानंतर राज्यात भव्य परिचय संमेलनाचे आयोजन होणार : आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांची माहिती.

 *पुणे, डॉ. संदेश शहा.सहसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो. ९९२२४१९१५९*


जैन समाज हा सुशिक्षित, प्रगतीशील समाज असून या समाजाचे देशाच्या अर्थकारणात अल्पसंख्याक असून देखील महत्वपूर्ण योगदान आहे. मात्र काही कारणामुळे समाजातील विवाह समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वधू वर यांना मनपसंद जोडीदार मिळण्यासाठी रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात वधू वर परिचय स्नेह मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती पुणे आनंद दरबाराचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी दिली.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात, बदलत्या सामाजिक व शैक्षणिक परिस्थितीत जैन समाजामध्ये योग्य वयात विवाह न होणे ही गंभीर समस्या असून  त्यामुळे समाजातील हा गंभीर प्रश्न सर्व जिव्हाळ्याच्या शक्तींना एकत्र करून सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत सकल जैन वधू-वर परिचय मंच, पुणे चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी व्यक्त केले. "वधू-वर परिचय ही काळाची गरज" असल्याचे ठामपणे सांगत त्यांनी या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जैन

समाज पूर्वीपासून  व्यवसायात व्यस्त राहिल्यामुळे कौटुंबिक 

जबाबदाऱ्यांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. बदलत्या काळानुसार समाज शिक्षणातही आघाडीवर आहे. मुलं व्यवसायात तर मुली उच्च शिक्षण व नोकरीत प्रगती करत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. परंतु उच्च शिक्षण, चांगले उत्पन्न, स्वावलंबनाची इच्छा,

मर्यादित कुटुंब पद्धती, शहरातच राहण्याची अपेक्षा तसेच विशिष्ट शहरातीलच जोडीदार हवा असल्याची अट यांसारख्या अनेक कारणांमुळे विवाह जुळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. 

ग्रामीण भागात सर्व भौतिक सुविधा असताना देखील ग्रामीण भागातील मुली पुढील भवितव्य लक्षात घेऊन विशिष्ट शहरांना प्राधान्य देत आहे तर जीवघेण्या स्पर्धेच्या युगात मुले शिकून ग्रामीण, निमशहरी व शहरात आपला व्यवसाय समर्थपणे करत असताना देखील त्यांना अपेक्षित वधू मिळत नाही. त्यामुळे उपवर मुलांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी मुला-मुलींचे वय वाढत चालले असून ही चिंतेची बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर विविध बायोडेटा ग्रुप्सना एकत्र आणून त्यांच्या अनुभवाचा समाजाला लाभ मिळावा यासाठी एक समन्वयित टीम उभी करण्यात आली आहे. या माध्यमातून विवाह योग्य युवक - युवतींना योग्य जोडीदार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाची सुरुवात म्हणून रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी पुण्यात जैन समाजातील अविवाहित युवक - युवतीं साठी भव्य वधू-वर परिचय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी दि. २० मे २०२६ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पुणे येथील वधू वर परिचय स्नेह मेळाव्यानंतर

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची परिचय संमेलने आयोजित करण्यात येणार असल्याचे सूतोवाच  बाळासाहेब धोका यांनी केले आहे.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पुढील संपर्क नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

संपर्क : पृथ्वीराजजी धोका - 9922436401

झुंबरलालजी गुगळे - 9049166116

अशोककुमार कटारिया - 9421016298

 सुनील देसर्डा - 9422226078

 पारसमल धोका 9881111855

सौ. सुरेखा बेटाला - 9422361910

 संपत गादीया - 9860298798

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा