इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. 9922419159
इंदापूरच्या सांस्कृतिक विश्वात रविवारी रंगलेला ‘अबब विठोबा बोलू लागला’ या बहुचर्चित महानाट्याचा प्रयोग रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. डॉ. कदम गुरुकुल ऑडिटोरियम येथे झालेल्या या प्रयोगाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभागृह हाऊसफुल्ल केले.
‘हास्य जत्रा’ फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांच्या अफलातून अभिनयाने आणि प्रभावी संवादफेकीने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. नाटकातील दर्जेदार विनोद, सामाजिक संदेश आणि कलाकारांचे जिवंत सादरीकरण यामुळे संपूर्ण वातावरण टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासोबत निर्माती नमिता वागळे गिरकर यांच्या नियोजनामुळे प्रयोग भव्य आणि यशस्वी ठरला. इंदापूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या नाटकाला स्थानिक रसिकांनी भरभरून दाद दिली. या प्रयोगा साठी प्रायोजक चंदुकाका सराफ, सहप्रायोजक सागर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल तसेच ओंकार मोबाईल यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी चंदुकाका सराफ सुवर्णपेढीचे ब्रँच मॅनेजर महादेव केसकर, सहाय्यक ब्रँच मॅनेजर पूर्व मेहता, क्लस्टर मॅनेजर राहुल घोरपडे, प्रदीप शिंदे, संकेत केरीमाने, दयानंद गायकवाड, सचिन कांबळे, अजय सोनवणे, सूरज भोसले, चंद्रकांत खाडे, सागर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉलचे पदाधिकारी, ओंकार मोबाईलचे गणेश रोडे, स्नेहा गणेश रोडे, ओंकार रोडे आणि इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमासाठी इंदापूर नगरपरिषदेने सुसज्ज सांस्कृतिक सभागृह बांधावे अशी मागणी अनेक नाट्य रसिकांनी यावेळी केली.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा