उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45,न्युज मराठी
मु.रूई,ता.बार्शी,जि.साेलापूर येथील सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक इंद्रजीत पाटील यांना ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रसूल साेलापुरे बहुउद्देशीय संस्था,महागाव,ता.गडहिंग्लज,जि.काेल्हापूर या संस्थेने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले.कवी इंद्रजीत पाटील यांच्या 'चिबाड' या कवितासंग्रहाची या पुरस्कारासाठी परीक्षकांनी निवड केली हाेती.या कवितासंग्रहास अल्पावधीतच मिळालेला हा नववा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.संस्थेचे अध्यक्ष प्रा.रसूल साेलापुरे,उपाध्यक्षा साै.परवीन साेलापुरे,सचिव श्री.अझहर साेलापुरे इत्यादी मान्यवरांनी हा साहित्य पुरस्कार त्यांना प्रदान केला.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.ग्रामीण भागातील या साहित्यिकांने आपल्या दर्जेदार लेखणीच्या जाेरावर मराठी साहित्य विश्वात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.यानंतर त्यांचा ' लापनिका ' हा लावणीसंग्रह येत आहे. साहित्यिक इंद्रजीत पाटील यांच्या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत असून बार्शी तालुक्यातील अनेक मान्यवर व हितचिंतकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा