Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २० मे, २०२६

केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे करमाळा शहरातील औषध विक्रेत्यांचा शंभर टक्के बंद यशस्वी औषध विक्रेत्यांनी पूर्ण दुकाने बंद ठेवून शासनाचा केला निषेध

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी निर्माण केलेल्या असमतोल स्पर्धेमुळे देशातील सुमारे 12 लाख 50 हजार पारंपरिक औषधी विक्री त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे सरकारच्या या भूमिके विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना AIOCDA याबाबतीत आक्रमक झाले असून 20 मे रोजी संपूर्ण भारत देशात देशव्यापी औषध विक्रेता बंद पाळण्यात आला आहे


 महाराष्ट्रातील या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळेल असा दावा तसेच सोलापूर जिल्ह्यातून चार हजार मेडिकल बंद करून या बंदला करमाळा तालुक्यातून 204 मेडिकल 100%बंद ठेवून करमाळा तालुक्याने उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे यासाठी करमाळा अध्यक्ष प्रतिनिधी करमाळा केमिस्ट संघटनेचे संचालक अभयसिंह शेंडगे यांनी पत्रकार परिषदेसमोर बोलताना करमाळा येथे केला

 आपल्या अखिल भारतीय औषधी विक्रेते संघटनेचे तसेच महाराष्ट्र राज्य संघटनेचे आपल्या सर्वांचे लाडके नेते केमिस्टन हृदय सम्राट माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी सरकारने औषध क्षेत्रातील नियंत्रित नफ्याच्या धोरणात तातडीने पुनर्विचार करावा सरकारी नियम( डी पी सी ओ 2013 ) अंतर्गत जीवनावश्यक औषधावर 2018 2020 मध्ये दोन जीआर शासनाने जारी केले ऑनलाईन ई फार्मसी हाजीआर मागे घेण्यात यावा तसेच इतर मागण्यांबाबत  समस्येबाबत संबंधित केंद्रीय मंत्री प्रशासकीय अधिकारी थेट पंतप्रधान साहेबांकडे वारंवार निवेदने पाठवून पाठपुरावा करण्यात आला मात्र सरकारने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे 

सरकारच्या या आडमुठ्या धोरणामुळे तसेच लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेवटी आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत असून सरकारने तातडीने  सकारात्मक निर्णय न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र व उग्र स्वरूपाचे करण्याचा इशारा करमळा संघटनेच्या तसेच जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात आला

 करमाळा तालुक्यातील हा बंद यशस्वी करण्यासाठी करमाळा संघटनेचे अध्यक्ष दीपक पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा संघटनेचे सचिव रवींद्र बरीदे उपाध्यक्ष व जिल्हा सहसचिव विवेक ननवरे, खजिनदार वैभव गायकवाड, संघटक संचालक आतिश दोषी, अभयसिंह शेंडगे, सचिन पाटील, सुभाष गाडे,  मंदार घोडके, प्रसाद माने,  विराज येवले, वैभव गुरव, आनंद वाघमारे, प्रशांत गुंड, गोरख शिंदे, धनराज शिंदे, निलेश दोशी,  विजय गांधी, सागर शेटे, प्रवीण नरुटे, शिवाजी हिरडे, तसेच सर्व केमिस्ट बांधव बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांनी घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध केला

करमाळा तालुक्यामधील जेऊर, वांगी केम, साडे, कंदर पारेवाडी, केतुर आधी भागात देखील औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून शासनाचा निषेध केला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा