उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या प्रेरणेने आयोजित रोप्य महोत्सवी राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार महासंमेलन 2025 मध्ये राज्यस्तरीय आदर्श बालगौरव विशेष गुणरत्न अचिव्हर्स आयकॉन अवॉर्ड 2025 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कु. प्रांजल दिपाली उद्धव चव्हाण हिला प्रदान करण्यात आला.
गुणिजन गौरव पुरस्कार मानकरी महासंघ यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात येतो. अवघ्या 10 वर्षांच्या प्रांजलने आपल्या अष्टपैलू गुणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गिर्यारोहण, स्कुबा डायविंग, स्केटिंग, स्विमिंग, जिम्नास्टिक, अबॅकस, म्युझिक, ऑलिम्पियाड आणि वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रांजलने उल्लेखनीय यश संपादन केले असून तिला आतापर्यंत 100 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
तिच्या असामान्य प्रतिभेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तब्बल 11 विक्रमांद्वारे करण्यात आली आहे. तिच्या या सर्वांगीण आणि प्रेरणादायी कामगिरीची दखल घेत तिला राज्यस्तरीय आदर्श बालगौरव विशेष गुणरत्न अचिव्हर्स आयकॉन अवॉर्ड 2025 प्रदान करून गौरविण्यात आले.
प्रांजल ही देवतळा, लातूर येथील असून इंदापूर येथील डॉ. कदम गुरुकुल या शाळेत इयत्ता चौथी शिकते.
प्रांजलला मिळालेल्या या मानाच्या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा