*अकलूज प्रतिनिधी*
*केदार-- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज : कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती, अकलूज येथे आयुष्याचा धावपळीत हरवलेल्या शाळेच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारा २००३-०४ या वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा तब्बल २२ वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेला स्नेह मेळावा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. गुरुजनांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असल्याचे पाहून गुरूजनांना अभिमान वाटत होता. कुणी डॉक्टर, वकील,अभियंता, शिक्षक, उद्योग-व्यवसाय, प्रगतशील शेतकरी तर कुणी सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करत असल्याचे अनुभव माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून व्यक्त केले. यावेळी अश्विनी काटकर(मगर), लक्ष्मी जाधव(बागल), रणजित काळे, दत्ता काटकर, तुषार माने यांनी मनोगतातून व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना जीवनातील संघर्ष, प्रामाणिकपणा, मैत्री तसेच सामाजिक बांधिलकी याविषयी बहुमोल मार्गदर्शन करत "विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी त्यांचे शाळा आणि शिक्षकांची असलेले नाते कधीच संपत नाही" असे भावनिक उद्गार काढत "माणुसकी, प्रामाणिकपणा आणि संस्कार यांची साथ कधीही सोडू नये" असा अनमोल संदेश दिला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून काशेट्टी सर, तर शेटे मॅडम, जावळे मॅडम, काळे मॅडम, लोटके मॅडम, एच. बी. मगर, एस. एस.भगत, पाटील खटावकर, नारायणकर, बागवानइ. शिक्षक वृंद तसेच लोंढे, मुलाणी, साळुंखे व इतर शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप राजगुरू, योगेश माने, रुपाली पवार(देशमुख) यांनी केले तर आभार आशा गायकवाड(निकम) यांनी मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा