Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ८ मे, २०२६

*नायब तहसीलदारांच्या भाचीचे उज्ज्वल यश ; बारावीच्या निकालात जिया पठाण कर्जत तालुक्यात प्रथम*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



बारावी परीक्षेच्या निकालात कर्जत येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी जिया अमजद पठाण हिने ९०.५०% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जियासोबतच श्लोक किशोर सांगळे (८७.६७%) व अनुष्का मुकुंद अनारसे (८७.३३%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. विद्यालयाने राबविलेल्या 'समर्थ पॅटर्न' अंतर्गत नीट (NEET) आणि सीईटी (CET) च्या विशेष तयारीमुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. जिया ही नायब तहसीलदार डॉ. मोहसीन शेख यांची भाची असून तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव राऊत व प्राचार्य चंद्रकांत राऊत यांनी तिचे कौतुक केले आहे. नियमित अभ्यासासह जादा तासिका आणि स्पर्धा परीक्षांच्या नियोजित तयारीमुळे हे यश मिळाल्याचे विद्यालयाने म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा