Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ८ मे, २०२६

श्रीक्षेत्र तुळजापूर येथील वाढत असलेली गुन्हेगारी खून चोऱ्या, वाटणारी बाबत पोलीस प्रशासन सपशेल अपयशी---महाविकास आघाडीच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियोजन सादर

 *तुळजापूर ---प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:-9730867448*


श्रीक्षेत्र तुळजापूर येथील कायदा व सुव्येवस्था धाब्यावर बसून, खुन, चोऱ्या व रस्त्यावरील वाहने अडवून लूटमारीचे प्रकार वाढत असून त्याला सर्वस्व जबाबदार तुळजापूर पोलिस स्टेशन व कर्मचारी असून या सर्व घटना रोखण्यात  तुळजापूर पोलीस प्रशासन सबशील अपयशी ठरले असून  पोलीस प्रशासन लुटमारीशी हाममिळवणी करीत असले बाबत. निवेदन तुळजापूर वासिय  नागरिक भक्त व महाविकास आघाडी तुळजापूरच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मार्फत पोलीस उपविभागी अधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालय तुळजापूर यांना तक्रारी निवेदन देण्यात आले आहे






याबाबत सविस्तर वृत्त असे की




वरील विषयी खेद पुर्वक निवेदन करतोत की, श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येणाऱ्या भक्तांची वाहने रस्त्यात अडवून दिवसा व रात्री लुटमारीचे प्रकार वारंवार घडत आहेत. तसेच तुळजापूर शहरातील व महिला भक्त यांचे भर दिवसा गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी होत आहेत. अद्याप एकाचाही तपास केलेला नाही व भर चौकात रहदारीच्या रस्त्यावर जिवंत मारणे आणि हात, पाय, मोडून डोके फोडण्याचे प्रमाण हे फार वाढले असून याला सर्वस्व जबाबदार तुळजापूर पोलिस स्टेशन जबाबदार आहे. तसेच तुळजापूर शहरात अवैद्य धंदे नियम बाह्य ड्रग्स, दारु, गांजा, इत्यादी विक्री व व्यवसाधीनचे प्रकार दिवसान दिवस वाढ होत असून तुळजापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा बट्या बोळ केलेला आहे.


तसेच महिला, लहान मुले आणि तरुण विद्यार्थिनी यांना आपल्या शहरात वावरणे कठीण झाले आहे. या गुन्हेगारीमुळे बाहेरुन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या मनात दहशत निर्माण झाली असून, शिक्षणास येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेनदिवस कमी होत आहे




वरील सर्व बाबींकडे कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस खाते व गुप्तचार यंत्रणा दुलर्क्ष करित असलेले जाणवत असून यामुळे वाईट प्रवृत्तीच्या गुंडावर कायद्याचा वचक व भिंती राहिलेली नसून, त्याच बरोबर मागील बऱ्याच वर्षांपासून चोऱ्या व इतर गुन्ह्यांचा अद्याप तपास लागलेला जाणवत नाही.



तरी कृपया मा. साहेबांना विनंती की, वरील निवेदनचा विचार करुन तुळजापूर पोलिस स्टेशन अधिकारी व काही कर्मचारी यांची नार्को टेस्ट केल्यावर सर्व काही बाहेर येईल तरी याबाबत आपण त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन तुळजापूर शहर व तालुका कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून तुळजापूर शहर व तालुका बहिमुक्त करावे हि विनंती नाविलाजास्तव आपल्या विरोधात लोकशाही मार्गाने जनअंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार रहाल याची कृपया नोंद घ्यावी.

आपले खाली सह्या करणारे नागरिक व महाविकास आघाडीचे सदस्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा