*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- येथील अश्व त्रिरात्र महासोमयागाचा समारोप अंतिम टप्प्यात पोहोचला असून आज धार्मिक व भक्तिमय वातावरणात पूर्णाहुती संपन्न झाली. २५ मेपासून सुरू झालेल्या या वैदिक महायज्ञाची सांगता उद्या, १ जून रोजी अवभृत स्नानाने होणार आहे.
महासोमयागाचे मार्गदर्शक व यज्ञकर्ते यज्ञमार्तंड बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर सेलूकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ३३ वा सोमयाग शास्त्रोक्त पद्धतीने पार पडत आहे.
यज्ञस्थळी वैदिक मंत्रोच्चार, यज्ञीय विधी आणि आध्यात्मिक वातावरणामुळे भाविकांना अद्वितीय अनुभूती मिळाली. यज्ञामध्ये परिसरातील सामाजिक, राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. तसेच ग्रामस्थांचा उत्साहवर्धक सहभागही विशेष उल्लेखनीय ठरला.
सोमवार एक जून रोजी सकाळी नीरा नदीच्या संगमावर अवभ्रत स्नान होऊन महासोमयागाची औपचारिक सांगता होणार आहे. यानिमित्त यज्ञभूमीवर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून या वैदिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य आयोजक श्रीकांत दंडवते यांनी केले आहे.
फोटो - नरसिंहपूर येथील यज्ञस्थळी वैदिक मंत्रोच्चार, यज्ञीय विधीची अद्वितीय अनुभूती मिळाली.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा