Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ मे, २०२६

पँथरचे पुनर्जीवन करण्याची गरज* *दशरथराव कांबळे* *श्रीपूर*

 *बी.टी शिवशरण --श्रीपूर*


आंबेडकरी चळवळीला काही अंशी मरगळ आल्याचे चित्र आहे चळवळीतील कार्यकर्त्यांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी व सामाजिक राजकीय अभिसरण निर्माण करण्याचा एकमेव मार्ग अगर उपाय म्हणजे पँथरचे पुनर्जीवन करणे अशी स्पष्ट भूमिका आंबेडकरी चळवळीतील एक लढाऊ बाणा असलेले व आक्रमक नेते दशरथराव कांबळे यांनी मांडली आहे गेल्या आठवड्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे कुर्डुवाडी येथे त्यांचा नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित होते तेव्हा आठवले यांच्या समोर दशरथराव कांबळे यांनी आग्रही व व्यापक आपली भुमिका मांडली कांबळे यांनी बोलताना सांगितले की संविधान सामाजिक रक्षण करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती वाढवण्यासाठी व सामाजिक अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन प्रेरणा लढण्याची हिम्मत वाढवण्यासाठी पँथरचे पुनर्जीवन केले पाहिजे  पँथरचे काळात कार्यकर्त्यांत युवकांत जो जोश उत्साह लढण्याची उर्जा होती ती आता पुन्हा नव्याने निर्माण करण्याची काळाची गरज आहे आरपीआयचे काम कार्यकर्ते करतच आहेत सामाजिक राजकीय वाटचालीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरपीआयला सत्तेत सहभागी करून घेतले जात आहे एकीकडे आरपीआयचा लढा कार्यकर्त्यांना बळ मिळतं आहे मात्र सध्याच्या परिस्थितीत मागासवर्गीयांच्या अन्याय अत्याचार जातीय घटनेत वाढ होत आहे त्यामुळे असुरक्षितता वाढली आहे  आरपीआय ला सपोर्ट या वैचारिक न्याय भुमिकेतून दलित पँथरचे पुनर्जीवन झाले तर सामाजिक मंथन कार्यकर्त्यांत परिवर्तन घडून समाजाची ताकद वाढू शकते  कांबळे यांची भुमिका रास्त व सामाजिक न्यायाला धरुन आहे या बाबत सर्व स्तरातून यांवर आवाज उठवला जाणे अपेक्षित आहे सामाजिक राजकीय परिवर्तनाची लढाई दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे त्यामुळे पर्याय व्यवस्था उपलब्ध करुन ठेवली तरच पुढची लढाई लढणे सहजतेने होईल मात्र या विषयावर ना रामदास आठवले यांनी यांवर आपली भुमिका स्पष्ट केली नाही कदाचित या भुमिकेवर ते वेगळा कार्यक्रम घेऊन आपला निर्णय देऊ शकतात कांबळे यांनी मांडलेल्या भुमिके बाबत सोलापूर जिल्ह्यात मागासवर्गीय तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत या भुमिकेचे युवकांनी स्वागत केले आहे दशरथराव कांबळे हे सामाजिक राजकीय शेतकरी कष्टकरी आंबेडकरी चळवळीतील एक लढाऊ बाणेदार व आक्रमक चेहरा असलेलं खंबीर नेतृत्व आहे त्यामुळे त्यांनी या बाबतीत पुढाकार घेऊन यावर चळवळ उभी केली तर पँथरचे पुनर्जीवन होण्यास वेळ लागणार नाही  कांबळे हे थोड्याच कालावधी मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षात सक्रिय होण्याची शक्यता आहे रामदास आठवले यांनी कांबळे यांनी पक्षात अधिकृत प्रवेश करुन पक्षाची जबाबदारी स्विकारावी या बाबत रामदास आठवले यांचीही प्रामाणिक इच्छा आहे भविष्यात कांबळे आपले पत्ते ओपन करतीलही सोलापूर जिल्ह्यातील आरपीआयचे कार्यकर्त्यां मध्ये याबत उत्सुकता वाढली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा