*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
*"करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विद्यमान नारायण(आबा)पाटील यांनी सोलापूर येथे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन,जिल्हा पोलिस प्रमुख(ग्रामीण)अतुल कुलकर्णी व सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुशल जैन. यांच्या दिनांक 11 मे रोजी भेटी घेतल्या
करमाळ्याचे आमदार
नारायण(आबा)पाटील यांनी सोलापूर येथे मतदारसंघातील कामानिमित्त गेले असता सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारीसो,मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या समावेत करमाळा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा केली.मतदारसंघातील नव निर्मिती पोलीस स्टेशनं,त्यांना राहण्यासाठी वसाहती,कृषी विषयांवर तसेच शासनाच्या वतीने घेतले गेलेले निर्णय व करमाळा विधानसभा मतदार संघातील शासकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे यावर चर्चा केली.
सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी एकाच ठिकाणी भेटल्याने मतदारसंघातील कामा संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.त्यावेळी आमदार श्री.नारायण(आबा)पाटील यांनी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन,जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी व सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुशल जैन यांचा सन्मान केला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा