Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २६ मे, २०२६

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व सीएनजी दरवाढ व महागाई कमी करावी-तुळजापूर तालुका काँग्रेस सेवा दल कमिटीची मागणी

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

मो:-9730867448



केंद्र सरकारने  पेट्रोल, डिझेल व सीएनजी दरवाढ व महागाई कमी करावी. अशी मागणी तुळजापूर तालुका काँग्रेस सेवा दल कमिटी(आय)च्या वतीने तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार मार्फत  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

याबाबत सविस्तर वस्तू असे कि 

केंद्र सरकारने मागील १० ते १२ दिवसात पेट्रोल, डिझेल व सीएनजी याची दरवाढ केल्यामूळे शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व शेतीची मशगत करण्यास अडचण निर्माण होत असून ही दरवाढ सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. सदर इंधनवाढ झाल्यामूळे बाजारपेठेतील खाद्यतेलासहीत सर्वच वस्तुंचे भाव गगनाला भिडले असून ग्रामीण भागातील जनतेचे महागाईमूळे कंबरडे मोडले आहे.

तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मागील पिक विमा त्वरीत वाटप करण्यात यावा व शेतकऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांचे सिबील न बघता त्यांना तात्काळ पीक कर्जही वाटप करण्यात यावे व संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी हे या निवेदनानूसार कळविण्यात येत आहे.

पेट्रोल, डिझेल व सीएनजी दरवाढ कमी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी तातडीने योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर करण्यात याव्यात अन्यथा पुढील काही दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशी विनंती जिल्हा सेवादल काँग्रेस यांच्या वतीने करण्यात येत आहे.


आपला

१) विलास शाळू (जिल्हाध्यक्ष सेवादल काँग्रेस)

२) शिवाजी गायकवाड (महाराष्ट्र प्रदेश सेवादल सचिव)

३) तानाजी जाधव (तालुका सेवादल काँग्रेस)

४) सत्तार जाफर मुलाणी, तुळजापूर तालुका काँग्रेसचे सेवादल,अल्पसंख्यांक अध्यक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा