लोहारा. प्रतिनिधी*
*यशवंत भुसारे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अधीक मासात (धोडयाचा महिना) जावाई आणि लेकीला ३३ च्या संख्येचे वाण देण्याची परंपरा आहे. जावायाला विष्णुचे रुप साधुन त्याचा आदर सत्कार केला जातो. दान जप आणि भक्तीची जोड देऊन जीवनाला सार्थकता मिळवून देणारा हा पुरुषोत्तम मास प्रत्येकांच्या आयुष्यात मांगल्याचा प्रकाश आणतो.
तीन वर्षांनी येणारा अधिक मास अर्थात धोंड्यांचा महिना सुरू होताच ग्रामीण भागासह शहरांमध्ये पारंपरिक रिती रिवाजांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. घराघरांत जावई बुवासह सगेसोयरे यांना खास
निमंत्रण देत धोंडे जेवणाचे आयोजन करण्यात येत असून कौटुंबिक नात्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हा महिना पवित्र समजुन देवधर्म अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा भजन कीर्तनाचे आयोजन केले जाते आहे. या महिन्यात विवाहित मुलींना माहेरी बोलावून जावयांचा मानपान करण्याची जुनी परंपरा आजही उत्साहात जपली जात आहे. धोंडे जेवणानंतर जावाई बापुंना कपडे सोन्याची अंगठी तर मुलींना चांदीची भांडी किंवा जोडवी देण्याची प्रथा अनेक कुटुंबांत आज ही कायम आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे वाढते दर सर्व सामान्यांच्या
खिशाला झळ पोहोचवत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांनी यंदा परंपरा जपत खर्चाला आवर घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही ठिकाणी सोन्याच्या अंगठी ऐवजी गोड बोलून व प्रेमाची भेट देत नात्यांचा गोडवा टिकवला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
अधिक मासामुळे बाजार पेठांमध्ये कपडे, मिठाई व पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली असून ग्रामीण संस्कृतीचा पारंपरिक उत्साह
जावई वाण
पुन्हा एकदा अनुभवायला मिळत असुन, अनेक जावाई बापूना अंगठी घातली नाही म्हणून कोपऱ्यात बसून काढता पाया घेत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यात धोंड्याचा महिना अन् सावकास का जाईना.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा