Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १९ मे, २०२६

करमाळा येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसविण्यासाठी सकल धनगर समाजा सहित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिले मुख्याधिकारी यांना निवेदन

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्यासाठी करमाळा नगरपरिषद यांनी गायकवाड चौक, करमाळा येथे जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी सकल धनगर समाज आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी एकत्रित येत आज करमाळा नगर परिषदेचे नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत , उपनगराध्यक्ष अतुल फंड आणि मुख्याधिकारी यांना दिले .

राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा करमाळा शहरामध्ये बसला पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष पाहायला मिळत आहे परंतु अद्याप अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही . व अहिल्यादेवींची 300 वी जयंती पूर्ण देशभर अतिशय उत्साहाने साजरी होत असताना करमाळा शहरात अहिल्यादेवींचा पुतळा बसला पाहिजे असा सूर समाज माध्यमातून  उमटत होता . त्यामुळे आज सर्व स्तरातील सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध व्हावी याची मागणी लावून धरली .

यावेळी डॉ  श्रीराम परदेशी गणेश चिवटे , संजय सावंत , संतोष वारे , अमरजित साळुंखे ,शंभूराजे फरतडे ,हनुमंत मांढरे , जगदीश अग्रवाल , संजय घोलप ,शहाजी ठोसर , अभिषेक आव्हाड ,सचिन चव्हाण ,सचिन काळे , नरेंद्रसिंह ठाकूर, अशपाक जमादार, वनराज घोलप , मस्तकीम पठाण , दिनेश मुथा , आप्पा कोंढारे यांच्यासह सकल धनगर समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले , तसेच पत्रकारांची संवाद साधला . यावेळी नगराध्यक्ष सावंत , उपनगराध्यक्ष फंड आणि मुख्याधिकारी  यांनी  अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी दिले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा