लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख.
बैतुशशिफा दवाखाना, श्रीरामपूर
९२७१६४००१४,.
भारतीय उपखंडात समाज जीवनात सामाजिक साळोखासाठी समता सदभाव ना व एकात्मिक साळोखे टिकविण्यासाठी बाराही महिने कोणत्या ना कोणत्या समाजाचे सण उत्सव असतात त्यातूनच काही तरी बोध घ्यायचा असतो द्यायचा ही असतो त्यासाठी व त्याकाळी खुप गरिबीची परिस्थिती असायची फक्त्त राजा व थोडं फार लोकं च जरा व्यवस्थित खात पीत होते बहुतांशी लोकांना खायला व्यवस्थित नव्हतं तर सण वार गोड धोड खाणार कधी म्हणून यासाठी किंवा निमित्त म्हणून तरी महिना दोन महिन्यात कोणतातरी सण ठरलेला असो.
इस्लाम मध्ये अर्थात मुस्लिम समाजात मुख्य दोनच सण पाळली जातं (1) इद उल फितर अर्थात रमजान ईद (2) ईद उल आझ्हा यालाच बोली भाषेत भारतात बकरी ईद म्हणतात.
तसा इस्लामी काल गणणे नुसार मुहूर्रम हा पहिला व बकरी ईद बारावा महिना जिल्हिज्जा तील 10 दहाव्या दिवशी येते..बकरी ईद ही प्रेषित हजरत इब्राहिम अलै. सलाम व हजरत हजरा व हजरत इस्माईल अलै. यांच्या , खऱ्या अल्लाह परमेश्वरा प्रती भक्ती भावाच्या त्यागाची, समर्पित बलिदान करण्याच्या मानसिकता व त्यागाच्या वृतीची एक आठवण सुन्नाह आहेत.
हजरत इब्राहिम अलै. हें अल्लाह परमेश्वराचे एक संदेश वाहक प्रेषित होते, त्यांची पत्नी हजरत हजरा या ही अल्लाह च्या प्रती खुप श्रद्धाळु होत्या. ते साध्यच्या इराक मध्ये राहत, भक्ती करत करत त्यांचं खुप वयोवृद्ध 90 (नव्वद )वर्षाचेझाले तरी मुलं बाळं काहीच नव्हतं ईश्वराकडे भक्ती करून ईश्वराणे वयाच्या नव्वदित मुलगा दिला त्याचं नाव " इस्माईल" ठेवण्यात आलं. त्या दोघांना ईश्वराच्या आज्ञानुसार साध्यच्या प्रगत व तेंव्हाच्या अगदी ओसाड वाळवंटी प्रदेश मक्का येथे आणुन बेसहरा सोडून निघून पुन्हा सात आठ वर्षांनी पुन्हा आठवण आली म्हणून मक्का परत ले, मुलगा इस्माईल किशोर अवस्थेत पोहचून सर्व सुखी सुखी चाललं, तेवढ्यात अल्लाह ईश्वराला त्यांच्या भक्ती चीं परीक्षा घ्यायचीं होती म्हणून हजरत इब्राहिम अलै. यांना तीन दिवस स्वप्न पडत होती की तूझ्या अति प्रिय गोष्टीचं बलिदान पाहिजे म्हणून, या स्वप्नाचीं वाच्याता आपल्या पत्नी हजरा कडे व वृद्ध अवस्थेत झालेल्या व नुकत्याच किशोर अस्थेत आलेल्या मुलगा हजरत इस्माईल यांना बोलून दाखवली, अल्लाह चीं इच्छा म्हणून त्या अज्ञाधारक हजरत इस्माईल नीं लगेच मान्यता दिली.दुसऱ्या च दिवशी कुर्बानी चीं तय्यारी करून म्हातारे वडील हजरत इब्राहिम अलै. व लहान हजरत इस्माईल ला बरोबर घेऊन मीना च्या मैदानात पोहचून कुर्बानी च्या तय्यारीला लागतात, तर लहान मुलगा हजरत इस्माईल आपल्या वडील हजरत इब्राहिम यांना सांगतात की बाबा माझ्या वर सुरा चालवताना बघुन तुम्हाला रडू येऊ नये म्हणून तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधा..त्यावेळेस त्या आई बाबाची काय अवस्था असेल..?उतर्त्या वयात झालेल्या जो म्हातारपणीची काठी आपुन म्हणतोय त्या मुलाची कुर्बानी...? लगेच पट्टी बांधून त्या मुलाला पाठीवर उलटं झोपवलं जावून अतिशय तीक्ष्ण सुरा गळ्यावर फिरवण्याच्या क्षणी चं त्या वयोवृद्ध वयस्क हजरत इब्राहिम अलै. व हजरत हजरा व हजरत इस्माईल यांच्या खऱ्या भक्ती व त्यागाची समर्पित भावनेची मानसिक परिस्थिती परम दयालू कृपाळू अल्लाह व ईश्वराच्या नजरेत भरून क्षनार्धत तेथे एक बकरा- डुंबा अल्लाहनें तेथे आणुन कुर्बान -बळी- देतात.. तेथेच खऱ्या खुरी -भक्ती -बलिदान -त्याग समर्पित भावना- समर्पण अल्लाह च्या दृष्टीत पडते व तोच दिवस म्हणजेच कुर्बानी चा दिवस..आणि तेच आठवणी सुन्नत म्हणून...
जगभरातून लाखों च्या संख्या नें पवित्र हाज यात्रा साठी जातात तेथ हजरत इब्राहिम अलै सलाम यांच्या आठवणी सुनाह ताज्या करण्यासाठी जातात. हाजला जाणाऱ्याचीं बातमी सतत ऐकत असतो. याचं महिन्यात हाज यात्रा ही केली जाते.
इस्लामी पाच(५) स्तंभापैकी ५ वा स्तंभ ' हाज ' होय.
ज्यांच्याकडे मुलाबाळांचे सर्व खर्च भागून शिल्लक राहिलेल्या पैशातून ' हाज 'करणे , परंतु ज्यांच्याकडे पैसा असून 'हाज ' करीत नाही ते अल्लाच्या नजरेतून दोषी समजले जातात,.आयुष्यात एक वेळा पैसा असलेल्यांसाठीच हाज अनिवार्य केले आहेत.असो.
ऊर्द महिन्याच्या १२वा महिना जिलहिजज, हाजी ता. ८ जिलहिजला काबागृहामध्ये अंगावर पांढरेशुभ्र वस्र ्गुंडाळून पुरुष - स्त्री दोन्ही जातात. पांढरा शुभ्र वस्त्र पुरुष अडीच ते तीन मीटर कपडा सर्वअंगास गुंडाळून , एक खांद्या मोकळ सोडून, उघड्या डोक्याने व स्त्रिया पांढरा शुभ्र कपड्याचा ड्रेस परीधान करून हाज करतात , त्या दोन्ही पुरुष स्त्रीयां च्या गुंडाळलेल्या कपडास " ऐहराम '"संबोधित करतात.
ऐहेराम परीघान करून , '" आल्लाहा मी हजर आहे ,।। आल्लाहा मी हजर आहे।। आल्लाहा मी हजर आहे ।।।
आशा मंजुळ स्वरांचा निनाद दुमदुमत रात्रंदिवस मक्केमध्ये, हाजमय वातावरणात-" मीना" नावाच्या पंधरा - वीस किलोमीटर असलेल्या" आराफात " या पवित्र ऐतिहासिक मैदानात पोहोचतात .९ नऊ जिलहिज हाजचा प्रमुख दिवस, सर्व हाजी सकाळी बाराच्यासुमारास पवित्र ऐतिहासिक मैदानात पोहचून " मस्जिद ऐ नमराह ' त जोहरची नमाज अदा करून.आपल्या पापांची क्षमा ,करुणा मागतात, मुला-बाळांसंबंधी,नातेवाईकासंबंधी, देशासंबंधीत शांती व सुखी जीवनासाठी प्रार्थना- दुआ करतात.
त्याठिकाणी जगातील सर्व देशातून आलेले विविध भाषिक अर्थातच जवळपास " 3564 " बोलीभाषा बोलल्या जातात त्या ठिकाणाहून आलेले भाविक फक्त्त एकाच" आराफात "च्या पवित्र मैदानात एकत्र जमून कोणीही उच्य व गरीब नाही ,कोणी काळा व गोरा नाही अर्थात सर्व लेकरे आल्लाहाची आहेत.
सर्व माणसं समसमान सारखीच. 40 ते 50 लाख लोक एकाच रांगेत अल्लाच्या छताखाली अर्थात आकाशा खाली बसून अल्लाहच्या आदेशाचे पालन करतात, फक्त्त एकाच भाषेच्या कुरआन मजीद मधे सांगितलेल्या आदेशाचे पालन करतात. रडून-रडून, व्याकुळ होऊन ऊर बडवून पालन कर्त्या जवळ आपण केलेल्या कळत-नकळत पापांची क्षमा - माफी मागतात .अल्लाहा जवळ पाप मुक्तीची प्रार्थना करतात.
अशीच एक प्रसिद्ध आठवण म्हणून हजरत प्रेषित मुहम्मद स्व.नीं संबोधित केलेल्याbजगप्रसिद्ध ऐतिहासिक लोक कल्याकरी संदेश ज्याला जगात ( Historical Farewell Pilgrimage Speech) " हज्ज -तुल विदाह खुतबा " .( प्रबोधन) .म्हणतात.
प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. यांनी मक्का विजयानंतर त्यांच्या जीवनाची अंतिम हाज' यात्रेला दिले आहेत..
आपल्या पत्नीसह सुमारे लाखापेक्षाही जास्त सहाबा (अनुयायी )सह " 3 मार्च 632 'रोजी" आराफात" मैदानात दाखल झाले . हजरत प्रेषित मुहम्मद स्व.ना बघून तेथील जमलेल्या जनसमुदायाच्या उत्साहाला सिमाच राहिली नव्हती, भक्तीच्या अफाट सागरात लोटलेल्या भाविकांनी प्रेषित मुहम्मद स्व.या प्रबोधनाची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढतच होती,
प्रेषित मुहम्मद स्व सल्ल. आराफत च्या टेकडीवरून खूतबा ( प्रबोधन) स प्रारंभ केला,"
( "" सर्व स्तुतीसुमनं ही फक्त अल्लाहासाठी आहे : मी असे घोषित करतो की अल्लाहा हा केवळ एकच आहेत! व -प्रेषित मुहम्मद स्व. हें अंतिम प्रेषित (नबी व रसुल)आहेत. तुम्ही सर्व आदमची संतान आहात : तुमचा रब हा एकच आल्लाह आहेत . आदम हे मातीने बनवलेले होते , परंतु तुम्ही सर्व आपाअपसात एकमेकांचे बंधू -भाऊ आहात ,: तुम्ही सर्व मातीतूनच जन्मलेले आहेत : मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे ,: मानवामध्ये जात-पात , रंग ,.नसल,काळे-गोरे, वर्णदोषाला काहीच स्थान नहीं शेवटी सर्व मानवजात ही एकाच अल्लाहाची लेकरे आहेत .त्यामुळे संयम बाळगा . तुम्ही परस्परांचे गळे कापुन श्रद्धाहीन बिलकुल होवू नका .! कोणत्याही कळ्यांचा गोऱ्यांवर अधिकार नाही व कोणत्याही गोर्यांचा काळ्यावर अधिकार नाही असे म्हणत तुम्ही सर्व एकच आहेत .!
हे लोकांना जो अपराध करील त्यांच्या खेरीज अन्यकोणावर त्या अपराधाची जबाबदारी येत नसते : व त्यांनी केलेल्या अपराधासाठी त्याचा मुलगा जबाबदार असत नाही व त्याच्या मुलाने केलेल्या अपराधासाठी त्याचा बाप जबाबदार असंच नाही ; त्यामुळे खून खराबा पासून सावध राहा-- दूर राहा : तुम्ही परस्परांचे गळे कापून श्रद्धाहीन होऊ नका , कायम अल्लाहाचे भय बाळगा : .आल्लाहा सगळे काही बघत आहे :
तुम्ही कष्टाने काम करून खाणारे अल्लाहाला जास्त प्रिय आहेत . : त्यामुळे तुम्ही जे काही हाराम काम करत आहेत उदा. सट्टा खेळणे , व्याज देणे -घेणे, दारू पिणे व पाडणे., चोरी -लूट करणे, इत्यादी हाराम कामापासून अलिप्त रहा, सावध रहा ,दूर रहा ., # कष्ट करणारे आल्लाहाजवळ जास्त प्रिय आहेत .#
जर तुम्ही एखाद्यास ऊधार मदत केली असेल, तर, त्याच्याकडून व्याज व जास्तीचे पैसे घेऊ नका त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा ; जर तुम्ही कर्ज दाराजवळ एवढे पैसे नसतील तर तुम्ही त्याला माफ करा , संपूर्ण पैसे माफ करा. अशा करण्यामुळे आल्लाहच्या कृपाप्राप्त व्हाल. #
वारसांना वारसाहक्क लवकरात लवकर द्या.
. # महिला या अल्लाहाच्या ' आमानती ' आहेत, त्याबद्दल अल्लाहचे भय बाळगा, त्यांना त्रास देऊ नका ,त्यांचा योग्य सांभाळ करा ,त्यांचे जे काही हक्क असतील ते सर्व हक लवकर देऊन टाका. त्यांच्या विरासतीतील हिस्सा जो असेल तर लवकर देऊन टाका . ते विरासतीमधील हिस्सेदार आहेत .त्यांच्या बरोबर योग्य ज्ञाय -इंसाफ करा. #
# महिलांना तुम्ही अल्लाच्या जामीनावर स्विकारलेली आहेत . तर तुमचे तुमच्या पत्नीवर अधिकार आहेत ,# आणि तसेच तुमच्याप्रमाणे तुमच्या पत्नीचे तुमच्यावर अधिकार आहेत तर त्यांचे अधिकार द्या. त्यांना योग्य प्रकारे वागवा ,त्यांचा संभाळ योग्य प्रकारे कारा. त्याची तमा बाळगा. अल्लाहा सर्व काही बघत आहेत. कयामतच्या दिवशी तुम्हाला हिशोब द्यायचा आहे ; तर तुम्ही त्या दिवसाची आठवण ठेवा .#!"
हे लोकांनो माझे म्हणणे प्रबोधन -खुतबा काळजीपूर्वक ऐकावे !! कारण ! या वर्षांनंतर मी तुमच्यात असेल किंवा नसेल हे मी सांगू शकत नाही...!" तुमचे प्राण वित्त ,अंतिम निर्णय हा कयामतच्या दिवसापर्यंत पवित्र व अतुलनीय आहेत .
# लक्षात ठेवा!! शेवटी तुम्हाला अल्लाहासमोर हजर व्हायचे आहेत ,! तोच तुमच्या सार्या स्वर्गीय व नरकाच्या हिशोब बांधणार आहेत.! लोकांनों !! मी माझे जीवन कार्य पूर्ण केलेले आहेत मी माझ्या अल्लाहाचा कुरआन मजिद, (ग्रंथ) व त्यांच्या प्रेषितांचे सुन्नत(हादीस) तुम्हांसाठी सोडून जात आहेत : तर : त्यास सर्व श्रद्धेने आपल्या जीवनात त्यांच्यावर अंमल करा , अंमलात आणा! , तुम्ही सरळ मार्ग कधीही सोडू नका ! तुम्ही अल्लाहच्या मार्गावर चला. व सर्व जगात हा संदेश पाठवा ''.)
प्रेषितांचे प्रबोधन- प्रवचन स्पीच संदेश ऐकून लाखोंच्या संख्येने अनुयायी- मित्रगण (सहाबा रजि.) ढसाढसा रडू लागले व तिथूनच जेथून रस्ता भेटेल वाट भेटेल तेथून आपल्या स्वतःच्या घरा कडे ढुंकूनही पाहता लाडक्या प्रेषितांचे लोक कल्याणकारी संदेश घेऊन जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात ज्यांना जेथे जेथे मार्ग भेटले तेथे तेथे अनुयायी( सहाबा) नी व त्यांच्याही मानणाऱ्या सुफी संत- वलीं- पीर ,जेजे काही असतील प्रेषीतांचा लोककल्याणकारी संदेश शांतबद्ध रितीने संपूर्ण जगाच्या कोपऱ्या-कोपऱ्यात नेला...
लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख.
बैतुशशिफा दवाखाना, श्रीरामपूर
९२७१६४००१४,.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा