Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २७ मे, २०२६

*धक्कादायक....! पुणे शहरातून पाच वर्षात तीन हजार ३८८ मुली बेपत्ता; अद्याप* *१२६ मुलींचा शोध लागला नाही--तेजस्वी सातपुते*- *अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


पुणे : पुणे शहर परिसरात गेल्या पाच वर्षांत ३३८८ मुली बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी १२६ मुलींचा शोध लागलेला नाही. पाच वर्षांत एक हजार २४ मुले बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी २३ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. शहरातून बेपत्ता झालेली मुले, मुली, महिला, तसेच व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांकडून 'ऑपरेशन मुस्कान' ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्व पोलीस ठाणी, तसेच गुन्हे शाखेची पथके या मोहिमेत सहभागी होणार आहेत. पुणे शहरात बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढती आहे. प्रेमप्रकरणातून अल्पवयीन युवती, तरुणींना पळवून नेले जाते. काही प्रकरणात महिला बेपत्ता होता. कौटुंबिक वाद, आर्थिक विवंचनेमुळे काही जण बेपत्ता होतात.

२०२० पासून शहरातून तीन हजार ३८८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी १२६ मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही. २०२० ते २०२५ या कालावधीत शहरातून एक हजार २४ मुले बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी २३ मुलांचा शोध लागलेला नाही. गेल्या काही वर्षात शहर परिसातून १२ हजार ३६९ महिला बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी १७६ महिलांचा शोध लागलेला नाही. नऊ हजार ८३५ पुरुष बेपत्ता झाले असून, त्यापैकी एक हजार ९९६ जणांचा शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर शहरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी 'ऑपरेशन मुस्कान' ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती गु्न्हे शाखेकडून देण्यात आली.

गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेतील विविध पथके, तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमधील पथके या मोहिमेत सहभागी होणार आहेत. शहरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक, निकटवर्तीयांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. गर्दीची बसस्थानके, रेल्वे स्थानकांच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जाणार आहे.

'ऑपरेशन मुस्कान' मोहिमेतंर्गत शहरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. प्रत्येक बेपत्ता प्रकरणांचा (मिसिंग केस) गांभीर्याने तपास करण्यात येणार आहे. – तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा