Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ मे, २०२६

आशा वर्कर यांच्या विविध समस्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे – गणेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष, सोलापूर

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


: ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर भगिनी विविध समस्यांना सामोरे जात आहेत. अत्यल्प मानधन, कामाचा वाढता ताण, वेळेवर मोबदला न मिळणे, तसेच शासनाकडून अपेक्षित सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आशा वर्करमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी व्यक्त केले.

कोरोना काळापासून आजपर्यंत आशा वर्कर यांनी जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले आहे. गावोगावी जाऊन जनजागृती, लसीकरण, माता-बाल संगोपन, विविध आरोग्य मोहिमा यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, त्यांच्या कामाच्या तुलनेत मिळणारे मानधन अत्यंत अपुरे असून अनेक वेळा ते वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शासनाने आशा वर्कर यांना कायमस्वरूपी कर्मचारी दर्जा देऊन त्यांचे मानधन वाढवावे, विमा संरक्षण, निवृत्ती वेतन व इतर शासकीय सुविधा तात्काळ लागू कराव्यात, अशी मागणी गणेश कांबळे यांनी केली आहे.

             -#-------:👇👇 जाहिरात 👇👇:-------#


तसेच आशा वर्कर यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब व महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांना भेटणार असल्याचे त्यांनी म्हटले यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा