Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ मे, २०२६

करमाळा शहरातील श्री कमलादेवी कन्या विद्यालयातील तीन विद्यार्थिनींची पोलीस भरतीमध्ये निवड Head

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


शहरातील श्री कमला देवी कन्या विद्यालयतील तीन विद्यार्थिनीची पोलीस भरतीत निवड झाली असून या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा विद्यालयात महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून संस्थेचे संचालक शामराव पुराणिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व राष्ट्रगीताने झाली त्यानंतर प्रमुख  पाहुण्याच्या हस्ते पोलीस भरती निवड झालेल्या गौरी दत्तात्रय नलवडे दिपाली दत्तात्रय नलवडे व मुस्कान राज गफर या विद्यार्थिनीचा पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.        

                   *-------:👇👇 जाहिरात 👇👇:----*


       या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस टी शिंदे या होत्या संस्थेचे सचिव सुनील सूर्यपुजारी तसेच शिक्षक वृध्द पालक विद्यार्थी संस्थेची उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्याध्यापिका म्हणाल्या की या मुलींनी केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाही तर संपूर्ण शाळा आणि गावाची मान उंचावली आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त जिद्द चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम जोरावर हे यश मिळवले असून त्यांच्या या यशामुळे इतरांना  सुद्धा प्रेरणा मिळेल  सत्कार प्राप्त विद्यार्थिनी आपल्या यशा मागील प्रवास सांगताना शिक्षक व पालकाच्या पाठिंब्याचे विशेष महत्व सांगुन नियमित सराव शिस्त आणि स्वतः वर विश्वास ठेवल्यास लक्ष गाठता येते असे सांगून मुली पोलिस दला सारख्या जबाबदारीच्या  क्षेत्रातही सक्षमपणे काम करू शकतात असा विश्वास व्यक्त केला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षराने नोंदवला जाईल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा