*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावे अशी मागणी करमाळा तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष तसेच मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन प्रांतिक अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी तसेच माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केली आहे
प्रसिद्धी पत्रकात तांबोळी बंधू यांनी पुढे असे म्हटले आहे की, भारतात गाईला "राष्ट्रीय पशु" म्हणून घोषित करण्याबाबत अनेक धार्मिक सामाजिक संघटनेने मागणी केली असून त्यालाही सामाजिक आर्थिक आणि धार्मिक दिशा आहेत गोमातेस राष्ट्रीय पशु म्हणून घोषित केले तर त्याचे फायदे अनेक आहेत गोमाता ही केवळ प्राणी नसून भारतीय संस्कृती अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांच्याशी. खोलवर रुजलेली आहे असे प्रसिद्ध पत्रकार म्हटले आहे
गोमाता ही कामधैनुचे प्रतीक असून ती सर्व इच्छा पूर्ण करणारी मानली जाते अनेक देवदेवतांचा गायींशी संबंध आलेला आहे गाईचे संगोपन केल्यामुळे भगवान श्रीकृष्णांना गोपाळ कृष्ण म्हणून संबोधले जाते
गोमातेच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असल्याने तिला अनन्य साधारण महत्त्व आहे गोमाते पासून मिळणारे दूध दही तूप इत्यादी मानवी आरोग्यास पौष्टिक अन्न म्हणून फायद्याचे आहेत तसेच दूध दही तूप गोमूत्र शेण याला पंचगव्य संबोधले जात असून याचा उपयोग पूजेसाठीही होतो ग्रामीण भागात अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह गाईच्या दुभत्यावर होत असतो
गोमातेचे दूध पौष्टिक आणि पचनक्रियेस हलके असते त्यामुळे ज्यांना याची माहिती आहे ती याचा वापर आवर्जून करतात असे तांबोळी बंधू यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे
गोमूत्र आणि पंचगव्य याचा आयुर्वेदात औषधाकरिता वापर केला जातो गोमाते च्या सहवासाने आणि तिचे पालन केल्याने शांती मिळते असेही मानले जाते भारतात गाईला बहुतांश जनता गौमाता म्हणून संबोधतात
गाईला राष्ट्रीय पशु घोषित करणे हा फक्त धार्मिक विषय नसून संविधानिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा आहे यामुळे काही क्षेत्रांना याचा फायदा होऊ शकतो मात्र गाईला राष्ट्रीय पशु चा दर्जा देण्यापूर्वी सर्व समाज घटकांना विश्वासात घेऊन विचार करून संतुलित धोरण आखणे आवश्यक आहे
गाईला राष्ट्रीय पशुचा दर्जा प्राप्त झाल्यास गाईंच्या संरक्षणासाठी अधिक कडक कायदे लागू होऊ शकतात त्यामुळे अवैध गौहत्या कमी होण्याची शक्यता असून त्याला मदत होईल त्यामुळे गो हत्या नियंत्रणात येऊ शकते
गोमातेचे संवर्धन वाढल्यास दूध उत्पादन शेतीसाठी शेणखत गोमूत्र उत्पादने इत्यादींना मिळू शकते त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ही मजबूत होण्यास मदत होणार आहे
त्याचप्रमाणे हल्ली देशी गाई दुर्मिळ होत चालले असून देशी गाईच्या जाती नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी शासनाकडून निधी अथवा विशेष योजना राबविल्या जातील सेंद्रिय शेती साठी उपयुक्त शेणखत व गोमूत्राचा वापर हा पीक वाढीसाठी आवश्यक असून यामुळे रासायनिक खताचा वापर कमी होऊन त्यावर अवलंबून राहता येणार नाही आणि रासायनिक खतांचा मानवी जीवनावर होणारे अनिष्ट परिणाम रोखता येतील हल्ली सर्वत्र दिवाळीच्या वेळी वसुबारस म्हणून साजरी केली जाते त्यावेळेस गोमातेची पूजा केली जाते मात्र गोमाता उपलब्ध न झाल्याने नागरिक चिखलाचे गोमाता तयार करून त्याची पूजा करतात त्यामुळे गोमातेस राष्ट्रीय पशुचा दर्जा दिला तर गोमातेचे संरक्षण ही होईल आणि पूजा होईल आणि सर्वांना गोमाता पूजेसाठी उपलब्ध होतील असेही उस्मान शेठ तांबोळी व अल्ताफ शेठ तांबोळी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तेव्हा केंद्र शासनाने गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून संबोधित करून तशा पद्धतीने आदेश पारित करावा अशी शेवटी मागणी तांबोळी यांनी केली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा