Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १० मे, २०२६

ऐन उन्हाळ्यात भीमा नदीवरील बंधारे पाण्याने तुडुंब, तर नीरा नदी कोरडी पडल्याने शेतकरी अडचणीत, पाणी सोडण्याची मागणी

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


                👆 निरा नदीचे पात्र 👆

- ऐन उन्हाळ्यात भीमा नदीवरील बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे काही दिवस तरी पिकांना जीवदान मिळणार आहे. तर नीरा नदी कोरडी पडल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो एकरांवरील पिकांना फटका बसणार आहे. तसेच पिण्याच्या पाणी योजना बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्याची मागणी होत आहे



                  👆भिमा नदीचे पात्र 👆

     नीरा नदीवरील गिरवी, ओझरे, लुमेवाडी, सराटी बंधारे सलग दोन वर्षापासून पाण्याअभावी रिकामेच राहत आहेत. तर सराटीसह वरील बंधारे पाणी आटू लागल्याने रिकामे पडू लागले आहेत. तसेच नीरा नदीकाठावरील इंदापूर तालुक्यातील सराटी, लिंबूडी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, गिरवी, नरसिंहपर, निरनिमगाव, भगतवाडी, पिठेवाडी, चाकाटी तसेच माळशिरस तालुक्यातील संगम, गणेशगाव, बिजवडी, सवतगाव, तांबवे, माळीनगर, अकलूज गावांतील हजारो एकरांवरील उभ्या असणारी पिकांचे पाण्याअभावी वाळवंट होण्याची भिती शेतकरेंनी व्यक्त केली आहे.

     भीमा नदीवरील नरसिंहपूर, टणू व भाटनिमगाव बंधारे उन्हाळ्यात उजनीतून सोडलेले पाणी अडवून तुडुंब भरले आहेत. त्यामुळे नदीवरील इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, टणू, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, बावडा, भांडगाव, भाटनिमगाव, बाभूळगाव तर माढा तालुक्यातील शेवरे, चांदज, टाकळी, गारअकोले, रुई, आलेगाव व रांजणी गावातील शेकडो एकर शेतातील पिकांना काही दिवसांसाठी जीवदान मिळणार आहे.

     उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आदी शहरांना पिण्यासाठी म्हणून मागील पंधरा दिवसापासून पाणी सोडण्यात आलेली आहे. नदीपात्रामध्ये वीज निर्मितीसाठी १६०० तर सांडव्यातून ४४०० असे ६००० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे.

      सदर गावातील नागरिकांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना बंधारे दुरूस्ती करून चांगले ढापे टाकण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे प्रशासनाने सदर बंधारेंची पाहणी करून दुरूस्तीचा योग्य प्रस्ताव शासनाकडे तातडीने दाखल करावा. तसेच नीरा नदीवरील बंधारे दुरूस्त करून त्यामध्ये कायमस्वरूपी पाणी अडवून साठवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

फोटो  - १) नरसिंहपूर येथे उजनी धरणातून भिमा नदीतून सोडलेले पाणी वाहत असताना दिसत आहे.

२) सराटी येथील नीरा नदीवरील बंधारेतील पाणी आटल्याचे बंधारा कोरडा पडला आहे. 

................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा