*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
"राजा सरख मन... मनासारखा राजा"असाच म्हणाचा मोठेपणा आज करमाळा नगरीत पाहायला मिळाला.आज करमाळा विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा विविध कार्यक्रमानिमित्त दौरा होता.त्या दौऱ्यानिमित्त "सह दुय्यम निबंधक-कार्यालय" याचा उदघाटन समारंभ महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या शुभहस्ते नियोजित होता.त्या निमित्ताने कार्यक्रम स्थळी महसूल मंत्री महोदय आले असता त्यांनी आमदार नारायण (आबा)पाटील यांचा हातात हात घेऊन कार्यक्रमाची फित कापण्यास सांगतली आमदार महोदय यांनी नकार दिला परंतु मंत्री महोदय यांच्या आग्रहाखातर त्यांना फित कापावी लागली.
खरंतर या कार्यक्रमाचे सर्व क्षण पहिले तर असं लक्षात येत की,राजकारणात मोठी राजकीय पद एवढी सहजा-सहजी मिळत नसतात त्यासाठी मन मोठ असाव लागत आणि ज्याच मन मोठं असल तोच माणूस कोणत्याही पदावर जनतेच्या आशिर्वादामुळे जाऊन बसू शकतो.कुणालाही राजकीय पद मिळत नाही त्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग व जनमाणसात अहोरात्र मिसळाव लागत आणि त्याच उत्तम उदाहरण म्हणजेच महसूल मंत्री .चंद्रशेखर बावनकुळे होते
साध गावच सरपंच पद मिळाल तर रुबाब दाखवणारी राजकारणी मंडळी आजपर्यंत कित्तेक जण बघितली परंतु महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या पदा पैकी पहिल्या पाच मध्ये गणलं जाणार महसूल मंत्री ह्या पदावरील व्यक्ती इतका साधा व मोठ्या मनाचा असेल हे आज पहिल्यांदाच पाहण्यात आले
आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आज करमाळा नगरीत आले असता त्यांच स्वागत करमाळा विधानसभा मतदारसंघाच प्रथम नागरिक या नात्याने आमदार .नारायण(आबा)पाटील यांनी केले.
त्याच बरोबर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे-,माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन व बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत या उदघाटन प्रसंगी उपस्थित होते







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा