Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १० मे, २०२६

ह.भ.प अंकुश रणखांबे महाराज "पंढरी वारकरी भुषण "पुरस्काराने सन्मानीत...

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


        लक्ष्मी नृसिंह अध्यात्मिक गुरूकुल वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प अंकुश रणखांबे महाराज यांना पंढरपूर येथील प्रतिष्ठीत वारकरी संप्रदायातील मानाचा "पंढरी वारकरी भुषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

    अंकुश रणखांबे महारांजांचे अध्यात्मिक कार्य, सामाजिक कार्य, वारकरी संप्रदायाची अखंड किर्तन सेवा, पंचक्रोशी, पंढरपूर, महाराष्ट्र भरची सेवा, अंखड हरिनाम सप्ताहे ५० गांवी चालू केलेले कार्य तसेच नरसिंहपूर येथे वारकरी संस्था स्थापन करून २१ विद्यार्थ्यींची निवासी सोय, भक्त प्रल्हाद संगीत विद्यालयतात ४० विद्यार्थी संगीताचे शिक्षण घेत आहेत. तसेच स्वत: अंकुश महाराज चैतन्य विद्यालयातील गरीब विद्यार्थी दत्तक घेऊन वर्ष भराचा शैक्षणीक खर्च करत आहेत. 

     चैतन्य विद्यालयातील विद्यार्थांना खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून "कै गणेश अंकुश रणखांबे स्मृती क्रीडा पुरस्कार" सन २०१२ पासून गेली अनेक वर्षापासून देत आहेत. सामाजिक कार्य ही त्यांचे चांगले आहे. गणेशगांव येथील "गणेश मंदिर" येथे दर महिन्याच्या चतुर्थीला गेली २५ वर्षे अखंड वारकरी संप्रदायाची किर्तन सेवा मोफत करत आहेत. तसेच नृसिंह मंदिरात दर वद्य एकादशीला देहूकर फडावर किर्तन सेवा करत असतात. लक्ष्मी नृसिंह मंदिरात नृसिंह जयंती नवरात्र उत्सवात "काल्याची किर्तन सेवा" गेली १९ वर्षे अंखड करीत आहेत. यासर्व धार्मीक उपक्रमाचा आढावा घेऊन  त्यांना पंढरपूरचा" पंढरी वारकरी भुषण" पुरस्कार देण्यात आला आहे.

फोटो - ह.भ.प. अंकुश रणखांबे महाराज यांना पंढरपूरचा "पंढरी वारकरी भुषण" पुरस्कार देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा