*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
धाराशिव जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी चा उल्लेख केला जातो. तामलवाडी ज्याठिकाणी 30 पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त कंपन्या कार्यरत आहेत ज्यामध्ये कंपनी चालकांनी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार नाकारून शासकीय नियमाप्रमाणे रोजगार देताना कामगारांचा पगाराचा खर्च जास्त येतो म्हणून येथील कंपन्यांनी परराज्यातील आदिवासी भागातील कामगारांना ठेकेदार पद्धतीने कमी पगारावर कामावर ठेवलेले आढळून येत असून.
ज्यामुळे तामलवाडी व परिसरात अंदाजे १०००-१२०० परराज्यातील आदिवासी कामगार लोक वावरत असल्याचे निदर्शनास येत आहे व कमी पगार मिळत असल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहकरता पैसे कमवण्याकरिता परराज्यातील काही कामगार चुकीच्या ओळखपत्राच्या वापर करून चोरी, ड्रग्स पोचवणे व इतर गुन्हेगारी कामे पैसे मिळवण्याच्या उद्देशाने करू शकतील त्यामुळे सर्व कंपन्यातील परराज्यातील कामगारांची ओळखपत्रे व त्यांचे वास्तव्याचे ठिकाणाचे करारपत्र घेऊनच त्यांना राहण्याची परवानगी देण्यात यावी ज्यामुळे तामलवाडी व परिसरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा होणार नाही.
अशी मागणी माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी जिल्हाधिकारी धाराशिव, पोलीस अधीक्षक धाराशिव, मुख्यकार्यकारीअधिकारी जिल्हा परिषद धाराशिव, व गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना केली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा