Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ मे, २०२६

*सोलापूर येथे रोटरी महारोजगार मेळावा 2026 चे आयोजन*

 *सोलपूर -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



*रोटरी क्लब ऑफ सोलापूर, महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), सोलापूर आणि इक्विटास डेव्हलप्मेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “महारोजगार मेळावा २०२६” गुरुवार, दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ड्रीम पॅलेस बँक्वेट हॉल, मुरारजी पेठ, सोलापूर.  येथे पार पडणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा रो. धनश्री केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली

आज प्रत्येक उद्योग व व्यवसाय क्षेत्राला कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी शोधणारे उमेदवार आणि कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता असलेल्या कंपन्या यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या महारोजगार मेळाव्यात २५ हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार असून बँकिंग, रिटेल, लॉजिस्टिक्स, ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन, टेलिकॉम, बीपीओ, मार्केटिंग, डेटा एन्ट्री, आरोग्य सेवा, ऑटोमोबाईल आदी विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट, समाजशास्त्र अशा विविध शाखांतील डिप्लोमा, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे. तसेच १० वी किंवा १२ वी पास/नापास, तसेच आयटीआय किंवा इतर विशेष प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठीही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून हा रोजगार मेळावा सर्वसमावेशक स्वरूपाचा असणार आहे. सोलापूरमध्ये उद्योगवृद्धी, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त कंपन्या व उद्योगांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या वर्षी असाच प्रकल्प राबविण्यात आला असून त्यामध्ये १०२ उमेदवारांना त्याच दिवशी प्रस्ताव पत्र देण्यात आले. 

उमेदवारांनी मुलाखतीसाठी प्राधान्य मिळावे यासाठी गुगल फॉर्मद्वारे पूर्वनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तथापि, काही कारणास्तव पूर्वनोंदणी करता न आल्यास मेळाव्याच्या दिवशी स्पॉट नोंदणी करूनही सहभागी होता येणार आहे. उमेदवारांनी बायोडाटाच्या अनेक प्रती, वैध ओळखपत्र आणि शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणावीत. 

या रोजगार मेळाव्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नसून उमेदवारांसाठी हा मेळावा पूर्णपणे निशुल्क असणार आहे.

रोटरी क्लब ऑफ सोलापूर, महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), सोलापूर आणि Equitas Development Initiative Trust या संस्थांनी गरजू युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची बांधिलकी व्यक्त केली.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी या मेळाव्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख ब्रिजकुमार गोयदानी यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेला इक्विटास डेव्हलप्मेंट इनिशिएटिव्ह ट्रस्टतर्फे सौ. माधुरी मुसळे, श्री. विजय रूपनर, सोलापूर आयटीआय कॉलेजतर्फे प्राचार्य मनोज बिडकर तसेच रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे डॉ. राजीव प्रधान, जयेश पटेल, निलेश फोफलिया, मितेश पंचमिया, संतोष कणेकर, सुहास लाहोटी आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा