Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ मे, २०२६

महिलेवर लैगिंक अत्याचार प्रकरणी मनोहर मामा भोसले यांचेवर करमाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल.

 *करमाळा.   प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


महिलेवर लैगिंक अत्याचार प्रकरणी मनोहर मामा भोसले यांचेवर करमाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून 

 याबाबत सविस्तर वृत्त असे की 

करमाळा पोलीस ठाणे येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मनोहर भोसले याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक, आर्थिक शोषण, धमकी व महिलेस मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी महिलेने जानेवारी 2025 मध्ये घरात पैसे यावेत काम मिळावे म्हणून मैत्रिणीच्या सांगण्यावरून वडाचीवाडी पुणे येथे मनोहर मामा भोसले यास भेटून त्याच्या सांगण्यावरून वडाचीवाडी येथील आश्रमातील चार वाऱ्या केल्या होत्या. त्यानंतर आश्रमातील नाथबाबा यांनी पुढील पाचवी वारी करण्यासाठी घोटी तालुका करमाळा येथे येण्यास सांगितले व त्या ठिकाणी मोठी पुजा करायाची आहे असे सांगितले होते. त्यानंतर नाथबाबा याने चालकासह फिर्यादीचे घरी जावून चारचाकी वाहनातून तिला घोटी येथील आश्रमात आणून राहण्यासाठी आश्रमातील खोली दिली व तिचेकडून 11,000/- रूपये घेतले. पहाटे मनोहर भोसले याने तिचे खोलीत येवून पुजेकरीता तीला कपडे काढण्यास सांगितले. त्यास फिर्यादीने नकार दिला असता जबरदस्तीने कपडे काढून मंत्रोपचार करून तिचेसोबत शरीसंबंध केले आहेत.

आरोपींनी धार्मिक पूजा, विधी व विविध अडचणी दूर करण्याच्या नावाखाली फिर्यादी महिलेकडून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक रक्कम स्वीकारली. संबंधित आरोपींनी फिर्यादीच्या अडचणींचा गैरफायदा घेत तिचा विश्वास संपादन करून विविध कारणे सांगत पैशांची मागणी केली आहे.

सदर प्रकारामुळे नागरिकांनी अंधश्रद्धा, धार्मिक भीती अथवा कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. कोणतीही व्यक्ती धार्मिक विधीए जादूटोणा, अडचणी दूर करण्याचे आमिष किंवा भीती दाखवून आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

सदर प्रकरणी करमाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा रेस नंबर ४६६/२२६ भारतीय न्याय समिता कलम ६४ (१), ३१८(२), ३१८ (४), ३५१ (१) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा रीतसर तपास सुरू आहे.


जनसंपर्क अधीकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापुर ग्रामी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा