Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ जून, २०२६

महाराणा प्रताप जयंती निमित्त सुतार गल्ली येथील सकल क्षत्रिय राजपूत समाज आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद 111 रक्तदात्यांनी केले आपले रक्तदान

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


वीर शिरोमणी तसेच हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती निमित्त करमाळा शहरातील सुतार गल्ली येथील महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती तसेच सकल क्षत्रिय रजपूत समाजाच्या संयुक्त विद्यमाने आयोजितन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिराला मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सदरच्या रक्तदान शिबिरात एकूण 111 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले असल्याची माहिती नगरसेवक अमोल परदेशी यांनी दिली यामध्ये प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू ब्रांडेड ब्यागा देण्यात येणार आहे



 याबाबत अधिक माहिती देताना नगरसेवक परदेशी पुढे म्हणाले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आजच्या धकाधकीच्या जीवनात रक्तदान हे फार महत्त्वाचे दान आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून यामध्ये रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले असल्याची माहिती श्री परदेशी यांनी बोलताना दिली 

यावेळी सदर रक्तदान शिबिराला नगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेवक अतुल फंड, समाजसेवक श्रेणिक खाटेर सेवानिवृत्त माजी नायब तहसीलदार माजिदभाई काजी, माजी नगरसेवक डॉक्टर श्रीराम परदेशी डॉक्टर रोहन जाधव डॉक्टर उमेश जाधव आदींनी भेटी दिल्या 

महाराणा प्रताप जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी सकल क्षत्रिय रजपूत समाज तसेच वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा