*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टणू येथे शैक्षणिक वर्ष 2026 -27 चा प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान पंचायत समिती सदस्य शिवाजी दादा पाटील उपस्थित होते.
यावेळी नव्याने दाखल होणाऱ्या इयत्ता पहिलीतील मुलांचे गणवेश, पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोड भोजनाचा आस्वाद देण्यात आला.
नवीन गणवेश, पुस्तके शाळा नव्याने सुरू झाल्या मुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद दिसत होता.
कार्यक्रमाचे नियोजन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ कुचेकर साहेब, बावडा बीट विस्ताराधिकारी पुष्पा पाटील मॅडम, केंद्र समन्वयक किशोर सोनार सर यांचे मार्गदर्शनातून व शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील सर, सहशिक्षक संदीप धापटे सर ,सुप्रिया भोसले मॅडम यांच्या संकल्पनेतून संपन्न झाले. कार्यक्रमास संदीप मोहिते, विकास मोहिते, महेश अण्णा मोहिते, गौरव मोहिते, बालाजी मोहिते, पौर्णिमा बळते उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा