*उपसंपादक -नूरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
महाराष्ट्रात गेली 27 वर्षांपासून कार्यरत असलेल्या एकता सेवा भावी संस्था आयोजित पुरस्कार समितीच्या वतीने दिला जाणारा प्रसिद्ध " राष्ट्रीय सामाजरत्न पुरस्कार " 2026 यावेळी पश्चिम महाराष्ट्रात गेली 30 वर्षांपासून सामाजिक,कृषी, शैक्षणिक, वैद्यकीय आणि रोजगार निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या " श्री जावेद इस्माईल अत्तार, पुणे " यांना जाहीर झाला आहे.
श्री जावेद अत्तार हे भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर विविध प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध करुन देत आहेत त्याचप्रमाणे शैक्षणिक आणि आर्थिक सेवा सुविधा पुरविण्याचे महत्वाचे काम 1) बायोब्राईट एंटरप्राइझेस, पुणे 2) राष्ट्रीय उद्यामिता आणि औद्योगिक कॉर्पोरेशन नवी दिल्ली 3) युनिव्हर्सिटी रिसर्च कॉर्पोरेशन, नवी दिल्ली 4) जागतिक रिपोर्टर संघटना, नवी दिल्ली , 5) नवयुग विद्यापीठ ट्रस्ट, महाड 6) ऍग्रिझोन इंडिया, पुणे इत्यादी संस्थेच्या संचालकपदी काम करत असताना करीत आहेत. भारतीय मुस्लिम OBC संघटनेचे श्री जावेद अत्तार संस्थापक अध्यक्ष आहेत.
गुरुवार,11 जून , दुपारी 2.30 वाजता मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान मुंबई येथे भव्य पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा ना श्री बाबासाहेब पाटील, आरोग्य राज्यमंत्री मा ना मेघनाताई बोर्डीकर, खासदार श्री रामरावजी वडकुते, आमदार श्री विक्रम काळे, आमदार श्री शिवाजीराव गर्जे, मौलाना आझाद महामंडळ संचालक श्री सलीम सारंग, राज्य अल्पसंख्याक आयोग सदस्य श्री वसीमभाई बुऱ्हाण ,सिने कलावंत, कलाकार , विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहिती एकता सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अजमत खान यांनी दिली.
महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात विविध क्षेत्रात त्यांचा मोठा मित्रसमूह आहे. सर्वच थरातून श्री अत्तार यांचे अभिनंदन होत आहे.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा