*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
आमदार नारायण आबा पाटील यांनी आज करमाळा तालुक्यातील शेलगाव, वांगी या भागातील वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, तालूका कृषी अधिकारी नेटके यांचेसह मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक आदि उपस्थित होते. यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बांधावर जाऊन धीर दिला तसेच नुकसान झालेल्या केळी, डाळींब आदिची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेलगाव तसेच वांगी ३ शिवारातील सारंगधर चव्हाण गट नं 123 (केळी.80 आर), गोरख धर्मा केकान 112 (केळी.60 आर), महादेव सुखदेव पवार गट नं 162 (केळी 2.00 हे आर), नवनाथ रामकृष्ण केकान 115 (केळी.80), किरण कालीदास साळुंखे (गट नं ६४ अ केळी १.६० आर), सुहास चंद्रप्रकाश दराडे गट नं ३३ (केळी), केतकी शैलैश घोगरे गट नं २५/२/अ (केळी), प्रदीप विश्वासराव देशमुख, प्रवीण विश्वासराव देशमुख, राजश्री प्रवीण देशमुख, एकनाथ शंकर भानवसे, अजय युवराज भोसले, सुधीर कृष्णांत रोकडे आदि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात त्यांचेशी आमदार नारायण आबा पाटील व तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी संवाद साधला.
आमदार नारायण आबा पाटील यांनी तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना तालुक्यातील उर्वरित ठिकाणी तातडीने पिक नुकसानीचे पंचनामे करून सदर अहवाल वरिष्ठांना सादर करावा अशी सूचना केली. तर केळी, डाळींब आदि पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर देखील करमाळा मतदार संघातील पिक नुकसानीबाबत तपशीलवार माहिती स्वतः सादर करणार असल्याचेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. तर तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी महसुल प्रशासनाने तर प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सुरुवात केली असुन शेतकऱ्यांनीही आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे फोटो काढून ठेवावेत. महसुल विभाग असे फोटोही सत्यता पडताळून स्विकारण्याची तयारी ठेवेने, जेणेकरून पंचनाम्याच्या कामास अधिक वेग येईल असे सांगितले. तर आमदार नारायण आबा पाटील यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी धीर सोडु नये व या नैसर्गिक आपत्तीमुळे ओढावलेल्या संकटात आपण स्वतः शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे सांगुन आज जरी काही भागात प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली असल्यास तालूक्याच्या पश्चिम, उत्तर तसेच पुर्व भागातही शेतकऱ्यांना वादळीवाऱ्यासह पावसाचा फटका बसल्याने चिंता व्यक्त करुन प्रशासनास अधिक सतर्क राहून नुकसान भरपाई मिळवण्याच्या दृष्टिने आवश्यक ती कार्यवाही वेगाने पुर्ण करुन घ्यावी असे सांगितले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा