*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा शहर व तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले राज्यभर नाव असलेल्या करमाळा मोहरम उत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर मिरवणूक प्रमुख पदी पैलवान सोहेल पठाण यांची मिरवणूक प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद यांच्या अध्यक्षतेखाली नालबंद मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमीर शेठ तांबोळी, जाकीर वस्ताद, जाफर घोडके, पैलवान इमरान वस्ताद, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार पत्रकार राजू सय्यद इस्माईल सय्यद पैलवान सलमान घोडके सारंग परदेशी पप्पू सय्यद अमर शेख बिलाल कुरेशी आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यंदाच्या मोहरम उत्सव समितीच्या बैठकीमध्ये बहुसंख्य मुस्लिम व हिंदू बांधवांनी सहभाग नोंदवला होता. मोहरम उत्सव हा पारंपारिक पद्धतीने करमाळा शहर व तालुक्यात पार पाडण्यात येत असतो. कायद्याचे पालन व संविधानाच्या अधीन राहून पारंपारिक वाद्य मध्ये मिरवणूक काढून हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने हिंदू बांधवांच्या सवाऱ्यांचा व डोल्याचा (ताबूत ) अंतर्भाव असतो. यामध्ये रजपूत समाजाची सुतार तालीम सवारी, लिंगायत समाजाची माहुले यांची सवारी, चिवटे यांचा डोला, कुंभार समाजाची सवारी , रंभापुरातील दुधाट यांची सवारी..
आदी सवाऱ्यांचा यामध्ये समावेश असतो. सदरचा मोहरम उत्सव हा शांततामय व उत्साहात साजरा करण्यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सुफरान शेख, भैय्या परदेशी, केतन परदेशी, फारुख कुरेशी, इरफान सय्यद, निहाल शेख, युसुफ शेख, अख्तर शेख, जावेद शेख, समीर शेख, शाहरुख नालबंद, भैया परदेशी, सलीम मदारी, सादिक सय्यद, जावेद झारेकरी, दिलावर मुलानणी आदि कार्यकर्ते. मोठ्या संख्येने मुस्लिम व हिंदू बांधव उपस्थित होते.
*चौकट*
हिंदू मुस्लिम ऐक्यतेचे प्रतीक म्हणजे मोहरम सण,,,,,,,,, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद
करमाळा शहरातील मोहरम सण म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्यतेचे प्रतीक होय गेली कित्येक वर्षापासून मोहरम सण हा हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून मोठ्या उत्साहामय वातावरणात सदरचा सण साजरा करतात या मोहरम सणांमध्ये मानाची सवारी समजली जाणारी म्हणजे नाल साहब या सवारीचे दर्शन देखील हिंदू बांधव मोठ्या संख्येने घेतात एकंदर पाहता सदरचा सण हा शहरातील मुस्लिम बांधवा बरोबर हिंदू बांधव देखील साजरा करतात या सणांमध्ये हिंदू बांधवांच्या मोठ्या प्रमाणात सवारी व डोले असतात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही सदरचा मोहरम सण हा शांततामय वातावरणात पार पाडणार असल्याची माहिती करमाळा शहराचे माजी नगराध्यक्ष तसेच मोहरम कमिटीचे मुख्य आयोजक शौकत भाई नालबंद यांनी दिली




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा