Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ११ जून, २०२६

*वाचन संस्कृती जपण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर च्या वतीने व्याख्यानाचे आयोजन*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


*वाचन संस्कृती जपण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर च्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे

सध्याच्या यंत्रयुगात हातात पुस्तक घेऊन अवांतर वाचन करण्याची सवय कमी होत चालली आहे. "वाचाल तर वाचाल" हा मंत्र आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे "वाचन अभियान आणि आपण" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे वक्ते सोलापूर येथील वाचन अभियानाचे प्रमुख श्री. श्रीधर खेडगीकर हे असून ते अवांतर वाचनाचे महत्त्व, वाचन संस्कृतीची गरज तसेच नव्या पिढीवर होणारे संस्कार आणि सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम *शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, हॅच फ्रीमेसन्स हॉल, रंगभवनजवळ, सोलापूर* येथे आयोजित करण्यात आला आहे.

रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या ५० व्या साप्ताहिक सभेअंतर्गत होणारा हा कार्यक्रम *सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,* असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा