Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ११ जून, २०२६

*माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार नाही का?* *ॲड.डॉ.अरूण आबा जाधव* *भटके विमुक्त समाजाच्या मुशाफिरी यात्रेत जाधव यांचे शासनाला सवाल?*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


भटके विमुक्त समाजाच्या घराची गणना व जनगणना तसेच संविधानाने दिलेले हक्क व अधिकार यांची जाणीव करण्यासाठी ॲड.डॉ.अरूण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक खर्डा येथील मदारी समाजाच्या वस्तीतून सुरू झालेली मुशाफिरी यात्रा पुणे जिल्ह्यातून आज सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे आली होती. 


 करमाळा येथील कैकाडी,मदारी,पारधी समाजाच्या वस्तीवर श्री रामकृष्ण माने सर व नटवरलाल काळे यांच्या नियोजनात पार पडली.

   या सभेला मार्गदर्शन करताना ॲड.डॉ.अरूण आबा जाधव म्हणाले की,आज देश डिजीटल बनण्याचे स्वप्न पाहत आहे.परंतु या देशाचा भटके विमुक्त समाज अजूनही स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भटकंती करीत आहे.या समाजाची खूप दयनीय अवस्था आहे.एकीकडे कुंभमेळ्यासाठी करोडो रुपयांचे बजेट तयार केले जाते परंतु जो समाज हजारो वर्षांपासून जीवन जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्यांच्यासाठी कोणतेही बजेट नसते हे या नाकर्ते सरकारचे अपयश आहे.देशात सध्या घरगणना व जनगणना चालू आहे.ज्या लोकांच्या घराला दरवाजा,खिडकी आहे त्यांच्या घराची नोंद केली जाते.एकीकडे देशात पशु, पक्ष्यांची गणना केली जाते.परंतु जो समाज पालात राहतो त्यांच्या पालाला ना दार आहे ना खिडकी त्याची नोंद होत नाही.या देशात जनावरांना किंमत आहे परंतु आम्हांला नाही.या देशाचा नागरिक म्हणून विचार येतो की आम्ही माणूस आहोत की नाही? आम्ही या लोकशाही देशात जन्माला आलो हा आमचा गुन्हा आहे का?त्यामुळे भविष्यात भटके विमुक्त समाजाला नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.घरगणना,जनगणना सोबत भटके विमुक्त समाजाच्या शिक्षण,आरोग्य,घर, राहायला जागा,लाईट,विविध शासकीय कागदपत्रे यांपासून वंचित आहे.त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही.

शासनाने या भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असे मत मांडले.

       प्रसार माध्यमांशी बोलताना आबा म्हणाले की,राज्यकर्ते या समाजाचा फक्त मतांसाठी वापर करतात आणि खोटी आश्वासने देऊन फसवणूक करतात.आज तरूणांची या हुकूमशाही सरकारच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी तयार झाली.हे सरकार घोटाळेबाज आहे.मोदी, फडणवीस सरकार देश चालवण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरले आहे.अशा या लबाड सरकारचा जाहीर निषेध केला.

यावेळी मुशाफिरी यात्रेचे राज्य समन्वयक संतोष चव्हाण सर, रामकृष्ण माने सर,बिलाल सय्यद मदारी,मंगलाबाई पवार, भालचंद्र काळे यांची भाषणे झाली.तर सभेला ऋषीभाऊ गायकवाड,जाकीर तांबोळी,विशाल लोंढे,सुभाष ओहोळ, मेहमूद मदारी, तसेच पत्रकार विशाल परदेशी,पत्रकार अलीम शेख उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष चव्हाण सर तर आभार प्रा.तुकाराम शिंदे सर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा